इतर

अकोले तालुक्यात अवैध दारू बंद होईना! हेरंब कुलकर्णी यांचा बैठकीवर बहिष्कार

तर समिती पदाचा राजीनामा देणार

अकोले प्रतिनिधी

अनेक प्रयत्न करूनही प्रशासनाकडून अकोले तालुक्यात अवैध दारू बंद होत नसल्याने दारूबंदी समितीचे सदस्य समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आजच्या दारूबंदी समितीच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला आहे पुढील बैठकीपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास आपण या समितीच्या सदस्य पदाचाही राजीनामा देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे


दारूबंदीचे दारूबंदी समितीचे प्रमुख म्हणून तहसीलदार अकोले यांनी आदेश देऊनही अकोले तालुक्यात दारू थांबवण्यासाठी अकोले पोलीस व उत्पादनशुल्क विभाग कोणतीच कारवाई करत नसल्याबद्दल समिती बैठकीवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्रात म्हटले आहे

अकोले तालुक्यातील अवैध दारू थांबावी म्हणून आपण दारूबंदी समिती स्थापन केली. नियमित बैठका आयोजित करता व पाठपुरावा करत आहात. पण या समितीत तुम्ही आदेश देऊनही अकोले तालुक्यात दारू थांबत नाही. या समितीचे सदस्य अकोले पोलीस निरीक्षक राजूर पोलीस उपनिरीक्षक व उत्पादन शुल्क अधिकारी अजिबात गंभीर नाहीत त्यामुळे मी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकतो आहे.

१) संगमनेर येथील ३ दुकानातून रोज अकोल्यात दारू येते. ठाणगाव व घारगाव येथील दुकानातून रोज दारू येते. संगमनेर येथील दुकानातून निघणारी दारू पकडणे व त्या दुकानावर कारवाई करणे उत्पादन शुल्क यांना शक्य असताना मागील बैठकीत समज
देऊनही श्री सहस्त्रबुढे यांनी कोणतीच गाडी पकडली नाही याचा अर्थ संगमनेर कार्यालय
यात सामील आहे.

२) राजूरचे नवीन पोलीस अधिकारी यांना आपण राजूर गावातील दारू पकडावी याचे आदेश दिले पण उलट झाले. श्री. पवार हजर झाल्यापासून राजूरमधील दारू विक्री करणारी दुकाने वाढली आहे. तेथील पोलीस सामील आहेत. मटका वाढला आहे
३) लिंगदेव, पिंपळगाव खांड, वीरगाव फाटा येथील महिलांनी दारू फोडूनही आज पुन्हा खुलेआम दारू सुरु आहे
४) लहित येथील हॉटेल, कोतूळ, ब्राम्हणवाडा, लिंगदेव, कळस, समशेरपूर, देवठाण, खिरविरे, इंदोरी फाटा,शाहूनगर,गणोरे, डोंगरगाव, धाम्बोडी फाटा, वीरगाव फाटा, वाकी, वारंघुशी येथील दारू सुरूच आहे.
५) ग्रामसेवकानी ग्रामरक्षक दलाचे ओळखपत्र न्यावेत व ग्रामरक्षक दलाची बैठक घ्यावी हे
प्रत्येक बैठकीत आपण ५ महिन्यापासून सांगूनही ग्रामसेवकांवर काहीच कारवाई नाही
वरील मुद्दे अनेकदा मांडूनही अकोले पोलीस राजूर पोलीस व उत्पादनशुल्क विभाग काहीच कारवाई करत नसल्याने मी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकत आहे.
राजूरमध्ये दारू विक्री वाढल्याबद्दल राजूर पोलीस अधिकारी श्री पवार यांची व संगमनेर
येथील दुकानावर कारवाई करत नसल्या बददल सहस्त्रबुद्धे या दोघांना निलंबित करण्याची स्वतंत्र्य मागणी दोन्ही जिल्हा अधिक्षक यांच्याकडे करत आहे.
आपण समिती प्रमुख म्हणून वरील मुद्द्यांवर कडक भूमिका घ्यावी पुढील बैठकीपूर्वी जर यात सुधारणा झाली नाही तर मी या समितीचा राजीनामा देत आहे.असे हेरंब कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button