सातत्य हेच यशाचे गमक आहे- आयर्नमॅन पंकज मुठे

आयुष्य ही एक विशाल रंगभूमी असून -आमदार डॉ किरण लहामटे
सर्वोदय विदयालयात वार्षिक स्नेहसंमेलन
व पारितोषीक वितरण समारंभ संपन्न.
अकोले प्रतिनिधी
यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे.जीवनात छोटया छोटया गोष्टींचा त्याग करा.सोशीयल मिडियाचा कमीत कमी वापर करा. संगत चांगल्या व्यक्तीबरोबर करा. अपयश मनातून काढून टाका.ध्येय ठरवा.मोठी स्वप्न पहा.तुम्ही तुमच्या क्षेतात आयर्नमॅन बना.त्यासाठी सातत्य महत्वाचे असून सातत्य हेच यशाचे गमक आहे.असे विचार आयर्नमॅन कॅलिफोर्निया विजेते पंकज मुठे यांनी व्यक्त केले.

राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषीक वितरण समारंभ संस्थेचे सचिव एम.एल.मुठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.याप्रसंगी आयर्नमॅन पंकज मुठे विचारमंचावरून बोलत होते.यावेळी कोषाध्यक्ष विवेकजी मदन, माजी सचिव टी.एन.कानवडे,संचालक प्रकाश टाकळकर, एस.टी.येलमामे,विजय पवार विलास पाबळकर, माजी प्राचार्य विलास नवले,लहानू पर्बत,प्रकाश महाले,निलेश देशमुख, सदस्या मैड ताई,कचरे साहेब,प्राचार्य डॉ.बी.वाय.देशमुख,भाऊसाहेब बनकर,संपत धुमाळ,दिपक बुऱ्हाडे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
आयर्नमॅन पंकज मुठे यांनी पुढे मार्गदर्शन करताना ध्येय, प्रेरणा,शारिरीक,मानसीक तयारी महत्त्वाची असून आत्मविश्वास यातूनच गुणवत्ता लक्षात येत असल्याचे विचार व्यक्त केले.

आमदार डॉ.किरण लहामटे यांनी आयुष्याचा सुरूवातीचा काळ कष्टाचा असेल तर पुढील आयुष्य सुखाचे जाते.कारण आयुष्य ही एक विशाल रंगभूमी असून त्यावरील आपण सर्व कलाकार आहोत.असे विचार व्यक्त करत आवडीनुसार क्षेत्र निवडा, स्पर्धा परिक्षांमधून यश संपादन करा. मोठी स्वप्न पहा. उद्योजक व्हा. निर्वेसनी रहा.आई,वडील गुरूजनांचा आदर ठेवा असे विचार व्यक्त केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव एम.एल.मुठे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,माजी प्राचार्य विलासजी नवले आदिंनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी शैक्षणीक वर्षातील विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विदयार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय
बेस्ट ऑफीसर पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय देशमुख,रोटरी क्लब राष्ट्र बांधणी पुरस्कार प्राप्त शिक्षिका कविता वाळुंज यांचा विषेश सन्मान करण्यात आला.
मान्यवर परिचय दीपक पाचपुते यांनी केले.स्वागत व प्रास्तावीक प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले. सुत्रसंचलन संतराम बारवकर यांनी तर उपप्राचार्य दिपक बऱ्हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


