इतर

अकोलेत ग्राहक दिनी तक्रारींचा पाऊस

बांधकाम विभाग , भूमी अभिलेख,नगर पंचायत व आरोग्य विभागच्या अनेक तक्रारी

 अकोले (प्रतिनिधी)

 अकोले येथे 39 वा राष्ट्रीय ग्राहक दिन अकोले तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला

यावेळी ग्राहक पंचायत  चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले, वीज वितरणचे शेळके, डॉ.सुनील शिंदे, अनंत घाणे, भाऊसाहेब वाकचौरे, माधवराव टिटमे, प्रमोद मंडलिक, वसंतराव बाळसराफ आदी उपस्थितत होते. 

         प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्व.बिंदू माधव जोशी व जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

        ग्राहक दिनाला यावेळी ग्राहकांची विक्रमी उपस्थिती होती. मात्र प्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्याने तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांनी सुरुवातीलाच अधिकारी जरी उपस्थित नसले तरी सर्व अर्जाचा त्या त्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विभागाच्या अर्जाचे निराकरण करण्याची ग्वाही त्यांनी दिली, मात्र कार्यकर्ते व ग्राहक याबाबत मुख्य अधिकारीच जर नसेल तर प्रश्न कसे सुटणार असा प्रश्न ग्राहक विचारत होते. याबाबत तहसीलदार त्यांना नोटीस पाठवणार असून त्यांची विचारना करणार असल्याने त्यांनी सांगितले.

       तसेच यावेळी अकोले नगरपंचायतने 2026 ते 2030 पर्यंतची कर मूल्यांकन आकारणी अवास्तव आहे अकृषिक वापराची सनद (औद्योगिक प्रयोजन) महसूल बाबतच्या अर्जावर चर्चा झाली. नाशिक- पुणे रेल्वे. नाशिक, सिन्नर, देवठाण, अकोले, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेड, पुणे अशी असावी ही मागणी ग्राहक पंचायत अकोले यांनी केली. घरगुती गॅससाठी ज्यादा पैसे आकारणी केली जात आहे. गॅसचे सबडीलर शोधा व त्यांच्यावर कारवाई करा.

         अकोले नगरपंचायतचे शहराचे ड्रेनेजची पाणी प्रवरा नदीच्या पात्राच्या प्रवाहात सोडू नये त्याचबरोबर दूषित पाणी होत असल्याने त्यावर पर्याय शोधावा.

           संगमनेर ते अकोले- राजुर- बोरी कोल्हार-घोटी राज्य मार्गावर असलेली अपुरे कामे, छोटे पूल, साईड पट्ट्या, रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड, रस्त्यावर पडलेले खड्डे, दिशादर्शक रोड साईन, झेब्रा क्रॉसिंग पट्टे टाकावे, खड्यांबाबत व स्पीड ब्रेकर बाबत हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी पालन करावे, अकोले ग्रामीण रुग्णालय हे सुगाव खुर्द येथे आहे तेथे तात्काळ शवविच्छादेन केंद्र तेथे सुरू करावे, तसेच शिधापत्रिका, रेशनकार्ड  गॅसच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या तक्रारी आल्या, अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून, अकोले शहरात व तालुक्यात चालू आहे ते बंद व्हावे, अकोले शहरासह 32 गावाला पाणीपुरवठा होणारी 32 गावची योजना 15 ते 20 वर्षांपासून रखडली आहे. अजूनही पूर्ण होत नाही प्रत्येक वर्षी वाढीव निधीचा प्रस्ताव केला जातो. 

         तालुक्यात बिबट्यांचे हल्ले वाढत आहे पिंजरे त्वरित वाढवा व लावावीत, भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनेक तक्रारी अर्ज आले, बीएसएनएलच्या अनेक अडचणी मांडल्या. माळीझाप, उंचखडक बु, ते इंदोरी रस्त्याचे रुंदीकरण, पुलाची उंची वाढवणे, निळवंडे कालव्याचे ठिकठिकाणचे अपुरे कामे, रस्ते त्वरित व्हावे इत्यादी मागण्या ग्राहकांनी यावेळी केल्या.

     यावेळी शारदा शिंगाडे, सुमन जाधव, मंगल मालुंजकर, हरिभाऊ अस्वले, राम रुद्रे, नरेंद्र देशमुख, वसंत बाळसराफ, सुनील देशमुख, ज्ञानेश पुंडे, माधव टिटमे, रमेश नाईकवाडी,   अनंत घाणे, जालिंदर बोडके, रामदास पवार, सुरेश आवारी, भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे, प्रा.बाळासाहेब बनकर, संदीप मालुंजकर, सुदाम मंडलिक, संदीप निळे, अर्चना एखंडे, योगेश कापसे, कॉ.तुळशीराम कातोरे, संतोष वाकचौरे, रामदास पांडे, खादी ग्रामोद्योगाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे, अशोक उगले कैलास तळेकर, प्रास्ताविक दत्ता शेणकर, अर्जाचे वाचन कार्याध्यक्ष महेश नवले, सूत्रसंचालन  राम रुद्रे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button