इतर

बुधाबाई भोजने यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने शाळेतील मुलांना झाडाचे रोपे आणि वही पेनचे होणार वाटप!

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील अबीतखिंड ( भोजनेवाडी) येथील आदर्श माता बुधाबाई भोजने यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्ताने शाळेतील मुलांना झाडाचे रोपे आणि वही पेन चे वाटप करण्यात येणार आहे

गावातील सर्वोदय विद्यालय,अबीतखिंड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाजेवाडी, भोजने वाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप केले जाणार आहे मुलांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून व एक वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी हा उपक्रम गेल्या चार वर्षापासुन राबवत असल्याचे आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी सांगितले

यावेळी पर्यावरण प्रेमी तसेच ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत असल्याची माहिती त्यांनी दिली

इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले , मा आ. बाबा गांगड, देवराम मुंडे, पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष देवराम लांडे, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड,अगस्ती साखर कारखान्याच्या व्हा चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई भांगरे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण अध्यक्ष प्रमोद दादा मोरे,लेंभे सर, राऊत सर, राजाराम बुवा शेलार( शरद प्रभासली प्रतिष्ठान अध्यक्ष) राजुर चे माजी सरपंच गणपतराव देशमुख, कोतुळ चे माजी सरपंच राजू पाटील देशमुख, भास्कराव येलमामे, सुनिल सोनार, मुखायध्यापक रामदास गीते, मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे,शिंदे सर,साबळे सर पत्रकार सुनील गिते आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button