इतर

तेलंगणा तील महात्मा फुलेंच्या पुतळा विटंबना घटना अत्यंत दुर्दैवी – के. आर. चौधरी

श्री संत शिरोमणी सावतामाळी
मित्र मंडळ, मुंबई ने नोंदविला निषेध

मुंबई दि 09 तेलंगणा राज्यात  संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर येथे  ६ फेब्रुवारी २०२६ रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.  या घटनेचा श्री संत शिरोमणी सावतामाळी मित्र मंडळ व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, , कोपरखैरणे नवी मुंबई चे पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे

महात्मा जोतिबा फुले हे आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे जनक आहेत त्यांनी शिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि स्त्री-पुरुषांच्या समान अधिकारांसाठी ऐतिहासिक कार्य केले आहे त्यांचा महाराष्ट्र नव्हे तर कोणीही त्यांचा आपण सहन करणार नाही असे म्हणून संत शिरोमणी सावतामाळी मित्र मंडळ मुंबई चे अध्यक्ष के.आर.चौधरी,उपाध्यक्ष वामन गार्डे सेक्रेटरी राजेंद्र कर्णे आदींनी या घटनेचा निषेध केला आहे

महाराष्ट्र चे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या कृत्याला सामाजिक न्यायावर झालेला हल्ला म्हटले असून यामागे विशिष्ट विचारधारेचा हात असल्याचा आरोप केला आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी याला भ्याड कृत्य म्हणत तेलंगणा सरकारकडे नवीन पुतळा बसवण्याची मागणी केली आहे. दोषींना तात्काळ अटक करणे, त्याच ठिकाणी नवीन भव्य पुतळा बसवणे आणि पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे अशा मागण्या विविध संघटनांनी केल्या आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button