रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे व्होकेशनल अवॉर्ड प्रदान समारंभाचे आयोजन.

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी ठीक साडेपाच वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना व्होकेशनल अवॉर्ड प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. जोगेंद्रसिंग मोतीसिंग बीसेन हे आहेत. या कार्यक्रमात सौ. रीना मानव मल्होत्रा,सतीश सूर्यवंशी, डॉ. स्वप्निल विधाते, डॉ. अतुल पुराणिक , आढव शैला पुंडलिक, डॉ.नागेश मदनुरकर व उदय खेडकर आदीं मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहेत.
सदरचा कार्यक्रम रोटरी कम्युनिटी हॉल गंजमाळ, नाशिक येथे होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे ,असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर व सेक्रेटरी सी ए.रेखा पटवर्धन यांनी केले आहे.



