इतर

श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार घोषित

प्रा. दिलीप सोनवणे, द.सा. रसाळ गुरुजी, शंकरराव जोर्वेकर मानकरी

संजय उकिरडे

श्रीरामपूर दि 31 येथील शिरसगाव भागातील इंदिरानगरमधील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे गेल्या ३६ वर्षापासून साहित्य पुरस्कार देण्यात येतात.२०२६ चे श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार घोषित झाले असून त्यामध्ये संगमनेर येथील प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय सावळेराम रसाळगुरुजी,कोपरगाव येथील नाट्यलेखक शंकरराव बाबुराव जोर्वेकर यांच्या ग्रंथांना पुरस्कार समितीने घोषित केले आहेत.


श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानची स्थापना ०९ मे १९९० करण्यात आली. संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या संयोजनाखाली गेल्या ३६ वर्षापासून सामाजिकसेवा, साहित्यिक उपक्रम, विद्यार्थी लेखन गौरव, पुस्तक प्रकाशने, अंधश्रद्धा निर्मूलन आणि संतविचार असे कार्यक्रम घेतले जातात. २०२५ मध्ये कुंभार समाजातील लेखकांची पुस्तके समितीस प्राप्त झाली. त्यामध्ये पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशन प्रकाशित प्रा. दिलीप सोनवणे यांच्या लई अवघड आहे बुवा, ग्रामीण विनोदी कथासंग्रह, श्रीरामपूर येथील सौ. मोहिनी शिवाजी काळे यांच्या आसरा प्रकाशन प्रकाशित माजी मुख्याध्यापक दत्तात्रय सावळेराम रसाळगुरुजी लिखित भावलेली माणसं व्यक्तिचित्रणसंग्रह,नाट्यलेखक शंकरराव जोर्वेकर लिखित बदलते रंग नाटक यांना हे राज्यस्तरीय पुरस्कार श्रीसंत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव समिती २०२६ च्या समिती मार्गदर्शक प्रा. विलासराव शिवाजी तुळे,अध्यक्ष प्रा. सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे,उपाध्यक्ष नितीन प्रभाकर जोर्वेकर, कार्याध्यक्ष सौ. श्रद्धा चेतन तुळे यांनी घोषित केले. १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रीसंत गोरा कुंभार यांच्या ७०९ व्या पुण्यतिथी उत्सव कार्यक्रमात हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कोषाध्यक्षा सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button