कोकणवाडी (ता अकोले) येथे बाल भैरवनाथ यात्रा उत्सव संपन्न.

एस. के. जाधव
महादर्पण प्रतिनिधी दि.३
अकोले तालुक्यातील विश्राम गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोकणवाडी गावात हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर बाल भैरवनाथ यात्रा उत्सव उत्साहात संपन्न.
सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमेला मानाची काठी व मानाचा ढोल खेड भैरवनाथाच्या दर्शना नंतर काठी कोकणवाडीला आणण्यात येते. दुपारी ढोल आणि डी. जे . च्या तालात सर्व गावकर्यां च्या उपस्थित मिरवणूक काढण्यात आली.
अवकाळी पावसामुळे मिरवणूकीत व्यत्यय आला.मात्र पावसाची तमा न बाळगता तरुण मित्र मंडळाने मिरवणूक थांबवली नाही. भक्ती भावाने, श्रद्धेने काठी भैरवनाथाच्या दर्शनाला नेण्यात आली.
रात्री अंबेवगण यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गावच्या सरपंच सौ. सुलोचना संतू जाधव, उपसरपंच श्री. जगन किसन लोहरे आणि वरिष्टांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.देवाच्या गाभा-यात आणि मंदीराला लायटींग व्यवस्था करण्यात आली होती. तुकाराम बेंडकोळी यांच्या सहकार्यातून विद्युत रोषणाई व फटाक्याची आतशबाजी करण्यात आली या रोषणाईने मंदीर सुशोभित केले होते. या रोषणाई साठी श्री पंढरी पुनाजी जाधव यांनी विशेष कष्ट घेतले होते.फटाक्यांच्या आतिषबाजीने असमंत दुमदुमले होते.लाईटचा लपंडाव चालू असल्यामूळे श्री सागर भांगरे यांनी जनरेटरची व्यवस्था केली होती. मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानांनी शोभा वाढवली होती.

ग्रामस्त, वडीलधारी मंडळी, महिला, तरुणवर्ग, कामगार कमिटी यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. त्यामध्ये मंदीराच्या दुरुस्ती संदर्भात चर्चा करण्यात आली. श्री एकनाथ गोड़े म्हणाले, ” हे मंदीर आमच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतिक आहे.” श्री ज्ञानेश्वर दत्तू जाधव यांनी यात्रेचा सर्व जमा -खर्च हिशोब जुळवून दिला. मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी वर्गणी ठरविण्यात आली. सर्वांनी सढळ हाताने मदत करावी असे अवाहान करण्यात आले.
यावेळी कामगार कमिटीचे श्री भाऊ बेंडकोळी, श्री एकनाथ गोडे,श्री तुकाराम बेंडकोळी, श्री विठ्ठल जाधव, श्री बहिरु जाधव, श्री ज्ञानेश्वर दत्तू जाधव,श्री भागवत काळू जाधव, श्री भगवान भागा जाधव, महादर्पन चे प्रतिनिधी श्री संतू किसन जाधव तसेच गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती श्री काळू सोमा जाधव, श्री अशोक वाळू जाधव, श्री संतू दत्तू जाधव, श्री दत्तू खंडू जाधव, श्री प्रकाश जाधव, श्री विकास जाधव, श्री विठ्ठल भागा बेंडकोळी, श्री महादू ढवळा बेंडकोळी, श्री उत्तम मुरलीधर गोडे,गुलाब गंगाराम गोड़े, श्री एकनाथ वाळू जाधव आदी ग्रामस्त उपस्थित होते.
आपल्या परिसरातील अपडेट साठी हा ग्रुप जॉईन करा
👇👇👇

