स्वतःच्या मोबाईलवर ही करा स्व-जनगणना -तहसीलदार धिरज मांजरे

संगमनेर प्रतिनिधी
देशात भारतीय जनगणना करण्यास सुरूवात झाली आहे.त्यादृष्टीने प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना प्रशिक्षणे दिली जात आहे.मात्र यावेळी प्रथमच डिजीटल जनगणना केली जात आहे.त्याच बरोबर प्रत्येक नागरिक हा स्वतःच्या मोबाईलवर देखील स्वयं-जनगणना करू शकणार असल्याने अधिकाधिक नागरिकांनी स्व-जनगणना करावी असे आवाहन संगमनेर तालुका जनगणना अधिकारी तथा तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यात तीन टप्प्यात शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेली आहे.दोन टप्पे पूर्ण झाली असून तिस-या टप्यात हे प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.तालुक्यात साधारणपणे 672 प्रगणक,112 पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते आहे.तहसिलदार हे स्वतः चार्ज अधिकारी आहेत.त्याबरोबर जनगणना लिपीक धंनजय गायवळ व तंत्रज्ञान सहाय्यक गणेश सोनवणे असे स्वतंत्रपणे विभाग काम पाहतो आहे.त्यासाठी स्वतंत्र कक्ष सध्या कार्यरत आहे.
सध्या 1 मे ते 15 मे रात्री बारा पर्यंत प्रत्येक नागरिक स्वतः आपल्या घराची व तत्सम माहितीची स्व-जनगणना करू शकणार आहे.त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक निर्धारित करून देण्यात आलेली गावे आणि निश्चित विभागात घरोघरी जाऊन पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करू शकणार आहेत.आरंभी घरांची गणना केली जाणार आहे.पुढील टप्पा हा फेब्रुवारी 2027 ला सुरू होणार आहे.सध्या आपल्या तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना देखील जनगणना कामासाठी नियुक्ती देण्यात आली आहे.त्याच बरोबर भविष्यातील परीस्थिती लक्षात घेऊन दहा टक्के अतिरिक्त कर्मचा-यांनी देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे.साधारण प्रत्येक प्रगणकाला 180 ते 200 कुटुंबाचे सर्वेक्षण करावे लागणार आहे.सर्वेक्षणाच्या दृष्टीने शासनाकडून नकाशे व आवश्यक ती माहिती पुरवण्यात येणार आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी आरंभीच्या स्वगणना कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आहेत प्रश्न-
स्वगणना करण्यासाठी नागरिकांना गाव,कुटुंब प्रमुखाचे नाव,लिगं,घर,घराचे बांधकाम प्रकार,छत,स्वच्छतागृह,मोबाईल,रेडीओ,दूरदर्शन,आंतरजाल सुविधा,घरातील माणसांची संख्या,जात संवर्ग.घराची मालकी हक्क प्रकार,विवाहीत जोडप्यांची संख्या.पिण्याचे पाण्याचे स्त्रोत,पिण्याच्या पाण्याची सुविधा,प्रकाशाची सुविधा व स्त्रोत,वापरल्या जाणा-या पाण्याचे व्यवस्थापन,घरात स्वयंपाकाला वापरल्या जाणा-या गॅस सुविधा,अन्न कोठे शिजवतात.स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन,संगणक-लॅपटोप सुविधा,सायकल,मोटार सायकल,चार चाकी वाहन, मोबाईन नंबर आदी माहिती नोंदवावी लागणार आहे.नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदवलेली माहिती पूर्णतः गोपनीय राखली जाणार असल्याने अधिकाधिक खरी माहिती नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.सदरची माहिती कोणत्याही परीस्थितीत बाहेर कोणालाही उपलब्ध करून दिली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
स्व गणनेसाठी शासनाच्या वतीने लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांनी खालील लिंक वर क्लिक करून स्व जनगणना करता येईल.https://se.census.gov.in
तालुक्यात सर्वाधिक प्रगणक हे घुलेवाडी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणार आहेत येथे 57 प्रगणक गुंजाळवाडी कार्यक्षेत्रात 22 प्रगणक, संगमनेर शहरांमध्ये 135 प्रगणक कार्यरत राहणार आहेत.
महादर्पण व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



