इतर

दिल्ली तील जंतर-मंतर वरील आंदोलनाला अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा

अकोले प्रतिनिधी 

दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनाला आज अकोले  येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरदचंद्र पवार) पक्षाचे यांच्या वतीने पाठिंबा दिला

 तहसील कार्यालयात अकोले  येथे  नायब तहसीलदार श्री.किसन लोहरे  यांना  याबाबत निवेदन दिले. 

महाराष्ट्रात व देशांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. विद्यार्थी रस्त्यावर उतरून न्याय मागत असताना सरकार मात्र कुठलीही दाद देत नाही. या देशाची वाटचाल हुकूमशाही कडे होऊ नये व विद्यार्थ्यांना आपलं भविष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊ नये यासाठी आज विविध मागण्या चे निवेदन  शरद पवारांच्या राष्ट्रवादी  काँग्रेस  पक्षाचे वतीने देण्यात आले 

. यावेळी  पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, विनोद हांडे, बाळासाहेब भांगरे, अमित नाईकवाडी, उमेश देशमुख, देवराम माने, भाऊ पाटील तळेकर,पोपट चौधरी सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

=====

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button