आजचे पंचांग व राशिभविष्य दि. ०२/०४/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १२ शके १९४४
दिनांक :- ०२/०४/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४२,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति ११:५९,
नक्षत्र :- रेवती समाप्ति ११:२१,
योग :- ऐंद्र समाप्ति ०८:३०,
करण :- बालव समाप्ति २४:१४,
चंद्र राशि :- मीन,(११:२१नं. मेष),
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:२८ ते ११:०१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५६ ते ०९:२८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०५ ते ०३:३७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:१० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
गुढीपाडवा, पंचांगस्थ गणपति पूजन, अभ्यंगस्नान, कडूनिंबाचे चूर्ण खाणे, संवस्तरारंभ, वस्तराधिपति शनि पूजन, वासंतिक देवी नवरात्रारंभ, श्रीराम नवरात्रारंभ, बालचंद्रमाव्रत, कल्पादि, चंद्रदर्शन(२०:००प.), मु. ३० साम्यार्घ्य, मारवाडी संवत् २०७९ आनंद नाम संवस्तर, व्दितीया श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १२ शके १९४४
दिनांक = ०२/०४/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
सेवावृत्तीने कामे हाती घ्याल. फक्त स्वत:चा विचार करू नये. कौटुंबिक प्रेम वाढीस लागेल. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात.
वृषभ
तुमची धार्मिकता वाढीस लागेल. आत्मविश्वासाने कामे हाती घ्याल. सर्वांशी आनंदाने वागाल. हसत-खेळत कामे कराल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल.
मिथुन
घाई घाईने कामे उरकाल. एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. व्यावसायिक लाभाकडे विशेष लक्ष ठेवावे. चोरांपासून सावध राहावे. क्षणिक आनंद उपभोगाल.
कर्क
तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. कामात मित्रांची मदत होईल. नवीन ओळखी वाढतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. हातातील कामात यश येईल.
सिंह
वडीलांची उत्तम साथ मिळेल. पारंपरिक कामात प्रगती कराल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.
कन्या
हातून एखादे सत्कार्य घडेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.
तूळ
अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. सट्टा, लॉटरी यांसारख्या मार्गाने लाभ संभवतो. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वैचारिक शांतता जपावी.
वृश्चिक
वैवाहिक सौख्याला बहर येईल. सहकुटुंब प्रवासाचा आनंद घ्याल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. जवळचे मित्र गोळा कराल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.
धनू
घरी जवळचे नातेवाईक गोळा होतील. जवळच्या लोकांशी हितगुज कराल. मानसिक शांतता शोधाल. पत्नीची बाजू समजून घ्यावी. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल.
मकर
फार अट्टाहास करू नका. जुन्या गोष्टींनी खिन्न होणे टाळावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्यावा. सरकारी कामात प्रगती होईल. जोडीदाराचे कौतुक कराल.
कुंभ
बोलण्यातून इतरांच्या मनाचा ठाव घ्याल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. चौकसपणे कामाच्या बाबी जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडावेत.
मीन
आवडते पुस्तक वाचाल. सखोल विचारांती निर्णय घ्याल. तुमची वैचारिक उत्क्रांती होईल. भावंडांचे सौख्य लाभेल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर