गर्भसंस्कार’, ‘सरकारी योजना’ व ‘स्वावलंबीसाठी विशेष माहिती’ !

सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव श्री मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त येथील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’च्या वतीने सर्व समाजातील महिलांसाठी ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजना आणि ‘स्वावलंबी होण्यासाठी विशेष माहिती’ रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष भाग्यलक्ष्मी तुम्मा, सचिव ममता तलकोकूल यांनी दिले आहे.
मार्केट यार्ड मागील जुना विडी घरकुल, प्रगती चौक येथील पेद्दा ताता गणपती जवळ असलेल्या ‘रेनबो प्री-प्रायमरी स्कूल’ मध्ये हा उपक्रम होईल. या उपक्रमात गर्भसंस्कार म्हणजे गर्भाशयात असतानाच बाळावर शारीरिक, मानसिक, बौध्दिक आणि आध्यात्मिक संस्कार करणे होय. ‘गर्भ’ म्हणजे आईच्या पोटातील बाळ आणि ‘संस्कार’ म्हणजे उत्तम विचार किंवा मूल्ये रुजवणे. आयुर्वेदानुसार बाळाच्या जडणघडणीची सुरुवात गर्भास्तेपासूनच होते. सकारात्मक विचार, योग्य आहार, चांगली पुस्तके, गर्भसंवाद यामुळे बाळ निरोगी, शांत आणि हुशार जन्मतात. याबद्दल अधिक माहिती डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी) या देतील.
याचबरोबर सरकारी योजना व स्वावलंबी होण्यासाठी विशेष माहिती स्वावलंबी भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक विनायक बंकापूर, चन्नवीर बंकुर, ज्ञानेश्वर जाधव आणि अनुलोम उपविभाग संवादिनी संगीता कोरे या सरकारी योजनांची माहिती देणार आहेत.
माहिती घेऊन स्वावलंबी बनून स्वतःच्या पायांवर उभे रहावेत तसेच दोन्ही उपक्रम महिलांच्या उन्नतीसाठी काळाची आवश्यकता आहे. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त सर्वच समाजातील महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावेत, असे आवाहन पद्मशाली सखी संघम’च्या मेघा इट्टम, जयश्री भिमनपल्ली,पल्लवी संगा, आरती आडम,मंजुळा दुधगुंडी, कल्पना कट्टा, गीता भूदत्त, संगीता बोडा, कल्पना कैरमकोंडा, वनिता सुरम, उमा गज्जम, वंशिका जक्का, हेमा मैलारी, लावण्या मच्छा, अंबुबाई पोतू, कविता साखरे, कला चन्नापट्टण, सविता येदूर, अंबिका म्याकल, रोहिणी संगा, रजनी जिल्ला, लता कुंदारम, प्रिती बोगा, वर्षा चिप्पा, सुनिता कोंकाटी, सुरेखा आडम, लक्ष्मी गाजूल, सुनिता धारा, लावण्या मदनाल, कांचना गज्जम, पूजा बोध्दूल माधुरी चिट्याल, सोनाली तुम्मा यांनी केले आहे.



