इतर

मान्हेरे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

शालेय कामकाज करताना जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांचे पालन करावे -केंद्र समन्वयक राम ओहळ

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव
वाकी-ता अकोले दि. 02
अकोले तालुक्यातील मान्हेरे केंद्रात माहे ऑगस्ट २०२६ ची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी पार पडली.
मान्हेरे केंद्राचे केंद्रसमन्वयक श्री . राम ओहळ यांच्या मार्गदर्शनात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. श्री युवराज तळपे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मुख्याध्यापक श्री विठ्ठल कवटे ( शेणीत )यांनी श्री राम ओहळ यांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
शिक्षकांना पुर्वचाचणी सोडविण्यासाठी देण्यात आली. त्यानंतर सुलभकांनी कामकाज सुरु केले.
श्री अर्जुन तळपाडे यांनी सर्व शिक्षक – शिक्षिका यांना संबोधीत करताना म्हटले की,” शिक्षण परिषद का महत्त्वाची आहे ? कारण वर्षभरात आपल्याला घडयाळी पन्नास तासांचे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहेत. म्हणून शिक्षण परिषद चुकवून चालणार नाही. वर्षभरातील १० शिक्षण परिषदा मिळून ४० तास ,ऑनलाईन प्रशिक्षणाचे काही तास पकडून तसेच सुलभक कार्यशाळेच्या कामकाजाचे व इतर प्रशिक्षणाचे तास मिळून हे शिक्षणाचे उद्दीष्ट पूर्ण करता येणार आहे . शिक्षण पद्धती बदलली असल्यामुळे आपल्यातही बदल करणे गरजेचे आहे. अध्ययन -अध्यापन समजून घेऊन प्रत्येक शिक्षण परिषद यशस्वी करावी. या परिषदेमध्ये भाषा आणि गणित विषयाचे अध्यापन राम ओहळ सरांच्या मार्गदर्शना खाली सुलभ होणार आहे.” तसेच त्यांनी अपेक्षित क्षमता बाबत मुद्देनिहाय चर्चा केली. वाचन समृद्ध वातावरण कसे तयार करावे?मासिक नियोजन, वार्षीक नियोजन व वाचन समृद्ध वर्ग कसे तयार करावे हे सांगीतले.


श्री होलगीर दिलीप ठका यांनी निपून महाराष्ट्र अभियान या विषया संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन क्षमता विकसित करून निपुण महाराष्ट्र अंतर्गत पूर्ण शाळा 100% निपुण बनवणे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर वेगवेगळा असतो, हे ओळखून दैनंदिन जीवनात त्याला पायाभूत संख्या ज्ञान, वस्तू आणि संख्या बेरीज वजाबाकी त्याचबरोबर विद्यार्थी कुठे अडखळतात ? एकास एक संगती न लावता वस्तू मोजतात त्यांची समस्या जाणून घेणे. बेरीज वजाबाकी समांतर पद्धतीने शिकवणे, कृती करून घेणे. वर्ग व्यवस्थापन आणि स्वयं अध्ययन यासंदर्भात चर्चा केली.
श्री पांडुरंग खाडे सरांनी खान अकॅडमी संदर्भात अकाउंट तयार करणे, वर्ग जोडणे, मास्टरी ध्येय निवडून अभ्यास देणे. विज्ञान तंत्रज्ञानावर सकारात्मक विचार करावा. विद्यार्थ्यांचा आयडी पासवर्ड सोपा असावा. मोबाईल वरती अभ्यास देणे. सोपे करून सांगितले.


श्री युवराज तळपे सरांनी विचार मांडताना सांगीतले,” विद्यार्थी पहिलीत दाखल झाल्यानंतर त्याला उजळणी, बाराखडी, गणिती क्रिया सारंच आलं पाहिजे पण तसे होत नाही. प्रथम त्याला अक्षरे, ध्वनी शिकवावे लागतात. आपण ज्या ठिकाणी काम करता तिथे सर्व नैसर्गिक पद्धतीने चालले पाहीजे हे तपासणे गरजेचे आहे. सन २००० मध्ये सर्वशिक्षा अभियान सुरु करण्यात आले. या अभियानांतर्गत पुढील वीस वर्षात काय करायचे आहे याचा आराखडा तयार करण्यात आला. सर्वशिक्षा अभियान याचा अर्थ सर्वांपर्यंत शिक्षण गेले पाहिजे. त्याचा मूळ हेतू असा – प्रत्येक मूल शिकले पाहिजे. त्यासाठी मूल शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी मूलापर्यंत गेले पाहिजे. म्हणून वस्तीशाळा, साखर शाळा, विटभट्टीच्या शाळा सुरु झाल्या.
दहा गाभाभूत घटक आणि दहा जीवन कौशल्य या वीस गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या. शिक्षण क्षेत्रासाठी जी ध्येय धोरणे ठरवून दिलेली आहेत ती आपल्या डोळ्यासमोर असावीत.”
यानंतर श्री राम ओहळ केंद्रसमन्वयक यांनी सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना मार्गदर्शन केले. शालेय कामकाज करताना जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांचे पालन करण्याचे सुचीत केले.
यावेळी रमाकांत भागडे, गणपत उघडे ,भीमा कोकतरे, सोमनाथ धिंदळे, लक्ष्मण मुठे, तुकाराम मधे, भरत सुकटे, गिरीधर सारुक्ते,दीपक साळवे, रामनाथ मुंढे,राजेंद्र देशमुख, देवराम बांडे,सर्जुन बांबेरे, राघू भांगरे, लालू कवटे, रघुनाथ वायाळ, मच्छिंद्र खाडे, दशरथ सोंगाळ, अर्जुन भांगरे, सुधाकर भांगरे, बाळासाहेब दातीर, तुकाराम बेणके, शामराव मुतडक, गौतम वैराळ, अंबादास जोर्वेकर,मीना आरोटे, अर्चना मोहंडूळे,भगवान लोटे, युवराज व्ही. गभाले, एस. आर. बर्मन, रोहिणी नवाळी,सविता शिंदे, दिलीप खरात, हेमंत मुठे, योगिता येलमामे, मनीषा आवारी, महादर्पन चे प्रतिनिधी संतु जाधव इत्यादी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
शेवटी नानासाहेब नाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button