इतर

ढोलेवाडी ग्रामपंचायत कडून अरविंद गाडेकर आणि शरद बटवाल सन्मानित.

संगमनेर प्रतिनिधी

– ” खरं सांगायचं तर सत्कार हा फक्त व्यक्तीचा होत नाही; त्या व्यक्तीने केलेल्या कार्याला मिळालेली समाजमान्यता असते. ग्रामपंचायतीने आमच्या पाठीवर कौतुकाची जी थाप दिली आहे, ती आमच्यासाठी सन्मान नाही, तर पुढील वाटचालीसाठी मिळालेली नवी ऊर्जा आहे.
ग्रामपंचायत म्हणजे केवळ रस्ते, पाणी, स्वच्छता आणि विकासकामे करणारी संस्था नव्हे; गावातील माणसांच्या सुख-दुःखाशी जोडलेली, गावाच्या स्पंदनांशी नाते सांगणारी लोकाभिमुख संस्था असते. ढोलेवाडी ग्रामपंचायतीने या परंपरेला आणखी एक सुंदर आयाम दिला आहे.
गावातील कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या मातीशी नाते जपून काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची दखल घेणे, त्यांचा गौरव करणे—हीदेखील एक प्रकारची सामाजिक सेवा आहे.आणि ही जाणीव ढोलेवाडी ग्रामपंचायतीने जपली, याचे मला विशेष कौतुक वाटते” असे उद्गार व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
जाणीव फाउंडेशन, संगमनेर यांच्या वतीने लोकनेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार अरविंद गाडेकर यांना कला विभागात तर शरद बटवाल यांना शैक्षणिक,क्रीडा आणि सामाजिक कामाबद्दल मा. आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


त्याबद्दल ढोलेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच शालिनी बाळासाहेब ढोले , उपसरपंच प्रियेशा बुळकुंडे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढोले , महात्मा फुले दुघ संस्थेचे चेअरमन भास्कर गुंजाळ, व्हाईस चेअरमन सुधाकर ताजणे, ग्रामपंचायत सदस्य शंकर ढोले, अमोल ढोले, पोलीस पाटील म्हस्के आणि मान्यवरांनी अरविंद गाडेकर व शरद बटवाल यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान केला.
शरद बटवाल म्हणाले , ” ढोलेवाडी ग्रामपंचायतीने केलेला हा सत्कार त्या आनंदात आणखी एक सुंदर भर घालणारा आहे.
पुरस्कार मिळाल्यावर आनंद होतो; पण आपल्या माणसांनी कौतुकाने खांद्यावर ठेवलेला हात मनाला अधिक श्रीमंत करून जातो.
आज माझ्या गावाने, माझ्या माणसांनी मला दिलेली ही कौतुकाची थाप मी आयुष्यभर जपून ठेवीन.आदिवासी भागात काम करताना जाणवते कि समाजसेवेची खूप गरज असून या लोकांचे अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात मला आनंद वाटतो आणि हे कार्य मी करत आहे.”
व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या मातोश्री कुसुम गाडेकर व पत्नी सविता गाडेकर आणि ढोलेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन क्षीरसागर सर यांनी केले. आभार शंकर ढोले यांनी मानले.

https://chat.whatsapp.com/DOEFP0raZUcHUxSqKKBER8

👆

संगमनेर तालुक्यातील अपडेट्स साठी या

ग्रूप मध्ये सहभागी व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button