ठाणगाव येथील पुं. रा. भोर विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात संपन्न…

ठाणगाव – सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या ,पुंजाजी रामजी भोर विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 139 वा जयंती सोहळा सभेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ढोल ताशाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.विद्यालयाचे प्राचार्य श्री. काशिनाथ तळपाडे यांनी विद्यालयाच्या यशाचा चढता आलेख व प्रगती आपल्या प्रास्ताविकातून मांडली. विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री. भांगरे बी.एस.यांनी आलेल्या पाहुण्यांचा व मान्यवरांचा परिचय करून दिला.कु.अनुष्का शिंदे हिने प्रभावी भाषणातून विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.
आपण विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून अभ्यासाने माणूस मोठा होतो असे मत मा.श्री.मुकुंद काकड यांनी व्यक्त केले. पुस्तकरूपी ज्ञानाने जीवनात सफलतापूर्वक वाटचाल करता येते असे प्रेरणादायी मत मा.कर्नल,श्री.मच्छिंद्र शिरसाट यांनी व्यक्त केले.

गुरु साई मित्र मंडळ ठाणगाव, तसेच.भोर कुटुंबीय व शिरसाट कुटुंबीय यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले. ठाणगाव विद्यालयाचे बरेचसे विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी झाले आहेत, विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपली वाटचाल करावी असे मत अध्यक्षीय भाषणात मा. श्री.संजय बैरागी यांनी व्यक्त करून सर्वांची मने जिंकली.
ग्रामपंचायत ठाणगावच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी पुं.रा. विद्यालयाचे पर्यवेक्षक मा. श्री.भांगरे बाळासाहेब शंकर तसेच जि.प.शाळा ठाणगाव चे उपशिक्षक श्री.वाघमारे यांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. विद्यालयाच्या बांधकामासाठी विविध दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली.यावेळी विद्यालयाचा संपूर्ण परिसर कर्मवीरमय झाला होता. सदर कार्यक्रमासाठी श्री.श्याम श्रीराम वालझडे, श्री.संजय शिंदे ,मा.श्री.प्रकाश जंगाधरे श्री.विलास रंगनाथ मोरे मा.श्री. संदीप कोल्हे तसेच मा.श्री.नयन केदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री.चव्हाण ए.के.व सौ.कविता घोडसरे यांनी केले शेवटी श्री.सातव एस.डी.यांनी सर्वांचे आभार मानले.


