रायगड जिल्ह्यातील लाडवली (ता पनवेल) येथील श्री.गणेश मामुनकर यांचे 10 व्या दिवशीही उपोषण सुरूच!

अलिबाग (ॲड. ठाकूर यांस कडून) :- रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील लाडवली येथील श्री. गणेश मामुनकर आपल्या न्याय हक्कासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले असून त्यास १० दिवस पूर्ण झाले मात्र रायगड महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
श्री गणेश महामुनकर यांच्या मालकीच्या जागेतून सांडपाण्याची लाईन विना परवाना टाकली यामुळे त्यांनी 2012 पासून शासना कडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून दाद मागितली परंतु झोपेचे सोंग घेतलेले महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत राहिले शेवटी जिल्हाधिकारी रायगड यांना बेमुदत आमरण उपोषणाची नोटीस देऊन अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दहा दिवसा पासून उपोषण सुरु आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून आपल्याला न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे त्यांची पत्नी व मुलगा दोघेही अंध असून न्याय मागत आहेत मात्र रायगड जिल्हा प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे .
श्री मामुनकर कुटुंबावर अन्याय झाल्याचे समजतात अलिबागचे समाजसेवक तथा रायगड भूषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. जयपाल पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याय बाबत चौकशी केली व दिलासा दिला. आणि जिल्हा महसूल खात्याच्या या वेदनादायक बाबीची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भरत शेठ गोगावले यांनी आज जिल्हाधिकारी रायगड यांना दूरध्वनीवर संपर्क करून तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्याचे समजते ,


