इतर

श्री व्यंकटेश बालाजी संस्थान तर्फे ब्रह्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक सेवांचे आयोजन

डॉ. रमेश बालाजीवाले 

महंत,पूजाधिकारी, ट्रस्टी 

नाशिक : श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्ट, श्री बालाजी मंदिर, कापड पेठ, नाशिक यांच्या वतीने ब्रह्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक विशेष सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना या विशेष सेवांमध्ये सहभागी होऊन धार्मिक विधींचा लाभ घेता यावा, यासाठी पूर्वनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

या अंतर्गत पुढील विशेष सेवांचे आयोजन करण्यात आले आहे :

१. श्रीनिवास कल्याणम् (विवाह)

शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून श्रीनिवास कल्याणम् (विवाह) हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ४ यजमानांना सहभागी होता येईल.

२. अष्टोत्तरशत कलशाभिषेकम्

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आश्लेषा नक्षत्र कलशाभिषेकम् आयोजित करण्यात आला आहे. या विशेष सेवेसाठी १०८ यजमानांची नोंदणी करण्यात येणार आहे.

३. पवमान अभिषेक

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजल्यापासून पवमान अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी २१ यजमानांना सहभागी होता येईल.

४. वेंकटेश होम (विष्णु याग)

रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून वेंकटेश होम (विष्णु याग) आयोजित करण्यात आला आहे. या सेवेसाठी ३६ यजमानांची नोंदणी करण्यात येणार आहे.

वरील सर्व धार्मिक सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आपली नोंदणी करावी. 

या धार्मिक सेवांबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी श्री. विक्रम बालाजीवाले – ९८९०६०५५४२ यांच्याशी संपर्क साधावा.

स्थळ : श्री बालाजी मंदिर, कापड पेठ, नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button