इतर

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एमएसएमई ची भूमिका महत्त्वाची – प्रदीप पेशकर

नाशिक प्रतिनिधी


     देशाच्या आर्थिक विकासाला गती देऊन स्वावलंबी व आत्मनिर्भर भारताची मजबूत पायावर निर्मिती करण्यासाठी तसेच रोजगार निर्मिती करणे, स्थानिक उत्पादनाला चालना देणे, निर्यात वाढ करणे आणि  उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांचे म्हणजेच एमएसएमई चे देशात महत्त्वपूर्ण स्थान आहे,असे उद्गार  प्रदीप पेशकर यांनी काढले.

रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित “आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी एमएसएमई ची भूमिका” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख होत्या.


     यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे क्रेडिट योजनेअंतर्गत आकाश चव्हाण यांना हातगाडीसाठी पन्नास हजार रुपये,  अमृता शिंदे यांना शिलाई मशीन साठी 50000 रुपये तसेच सनय फाउंडेशनला गिरणीसाठी 75 हजार रुपये दिले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा पारख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रोहित देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर चिंधडे व पल्लवी देशपांडे यांनी केले. रोटरीचे सेक्रेटरी ऋषिकेश सम्मनवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला हेमंत राजपूत रवी महादेवकर सोनाली चिंधडे नेहा विधाते, सुहास कुलकर्णी, दिलीप बेनिवाल,मंगेश अपशंकर, गौरव सामनेरकर, विनायक देवधर, मकरंद चिंधडे तसेच तैवानचे तीन रोटेरियन   उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button