इतर
डोंगरगाव येथील सौ.भागुबाई कारभारी उगले यांचे निधन
अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील जुन्या पिढीतील व्यक्तिमत्व सौ.भागुबाई कारभारी उगले यांचे आज बुधवारी सकाळी वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पच्छात पती, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. डोंगरगावचे माजी उपसरपंच व पत्रकार अशोक उगले, प्रगतीशील शेतकरी सोमनाथ उगले, सौ. अलका लहानू फटांगरे, सौ. जिजा दिलीप लांडगे, सौ. बेबी बाळासाहेब सहाणे व मीना कारभारी उगले यांच्या त्या मोतीश्री होत्या.
त्यांच्यावर डोंगरगाव येथे आढळातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.



