इतर

ठोकळवाडी येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उत्साहात


प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव
ठोकळवाडी, ता. अकोले : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेअंतर्गत राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय, ठोकळवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठोकळवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
मुलांना जंतांपासून मुक्त करून त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, तसेच त्यांच्या शारीरिक वाढीस व सर्वांगीण विकासास मदत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जंतसंसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. स्वच्छतेच्या सवयी, हात धुण्याचे महत्त्व आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शाळा व अंगणवाडी स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे.
या कार्यक्रमास राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब दातीर, श्री. घनशाम नवले, श्री. तुकाराम बेणके, श्री. विजय बढे, श्री. अशोक लांघी, श्री. पोपट भांगरे, महादर्पणचे प्रतिनिधी श्री. संतु जाधव, आरोग्य सेविका रोहकले मॅडम, श्री. सुकटे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर भांगरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे आरोग्य, निरोगी बालपण आणि सुदृढ भावी पिढी घडविण्यासाठी जंतनाशक मोहीम महत्त्वपूर्ण ठरत असून, पालकांनीही मुलांच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button