इतर

नेप्तीतील खळगा वस्तीच्या रस्त्याचे भाग्य उजळले,अनेक वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न मार्गी

नेप्तीच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही- आ. काशिनाथ दाते

अहिल्यानगर :प्रतिनिधी-

नेप्ती गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा ठाम शब्द पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी दिला. नेप्ती येथील खळगा वस्ती परिसरातील रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

नगर तालुक्यातील नेप्ती येथील खळगा वस्ती परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार काशिनाथ दाते यांच्या विशेष प्रयत्नातून या परिसरातील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. तसेच नेप्ती गावातील विविध विकासकामांसाठी तब्बल ६९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते करण्यात आले.

नेप्ती येथील खळगा वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबे वास्तव्यास असून, या भागात शेतीचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी या रस्त्याचा नियमित वापर करावा लागत होता . मात्र, अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याने शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्या-येण्यावरही याचा परिणाम होत होता.

या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी ग्रामस्थांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार दाते यांनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अखेर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. या कामामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी बोलताना आमदार दाते म्हणाले, “खळगा वस्तीतील शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा करत होते. पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागत होती. ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केली, मी पाठपुरावा केला आणि आज काम सुरू झाले आहे. नेप्तीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. गावातील प्रत्येक वस्ती, प्रत्येक रस्ता चांगला झाला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. नेप्तीच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.”

नेप्तीतील सहा विकासकामांसाठी ६९ लाखांचा निधी

नेप्ती गावातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी खालीलप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • कल्याण बायपास ते बाबासाहेब होळकर घर रस्ता – १० लाख रुपये
  • पोपट जपकर घर ते बाबासाहेब होळकर घर रस्ता – १० लाख रुपये
  • नेप्ती बायपास रस्ता सुधारणा – १८ लाख रुपये
  • स्मशानभूमी ते सय्यद वस्ती रस्ता सुधारणा – १८ लाख रुपये
  • रा.म.मा.-६१ ते रावळे वस्ती रस्ता – ५ लाख रुपये
  • कृष्णवाडी रस्ता – ८ लाख रुपये

एकूण – ६९ लाख रुपये

यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, उद्योजक बापू सोनवणे, माजी सरपंच विठ्ठल जपकर, माजी उपसरपंच फारुक सय्यद, माजी उपसरपंच बाबासाहेब होळकर, माजी उपसरपंच दादू चौगुले, सरपंच सविता संजय जपकर, माजी सरपंच संजय जपकर, माजी सरपंच अंबादास पुंड,उद्योजक संजय जपकर, प्राध्यापक एकनाथ होले, प्राध्यापक बंडू जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, चेअरमन उमर सय्यद, व्हाइस चेअरमन भाऊसाहेब होळकर, अंबादास जपकर, माजी चेअरमन अशोक जपकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जपकर, जालिंदर शिंदे, सौरभ जपकर, शिवाजी जपकर, आनंदा जपकर, मच्छिंद्र जपकर, दत्तात्रय जपकर, राजाराम जपकर, सुभाष जपकर, बापू जपकर, अशोक जपकर, तुकाराम जपकर, पोपट जपकर, संतोष चहाळ, सूरज पवार, विजय गडाख, भास्कर जपकर, अनिल पवार, नाथा जपकर, रफिक सय्यद , राजू जपकर, कारभारी जपकर ,दत्ता भांबरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button