इतर

डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित ‘साहित्य संवाद ‘ म्हणजे सामाजिक समरसतेचा दीपस्तंभ : नंदकुमार सैंदोरे

*
श्रीरामपूर (वार्ताहर ) साहित्यनिर्मिती ही समाज, व्यक्ती आणि संस्कृतीची खरी श्रीमंती असून डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित ‘साहित्य संवाद ‘ पुस्तक म्हणजे सामाजिक समरसता विषयी प्रबोधन करणारे लेखन असल्याचे मत श्रीनगर येथे कार्यरत असलेले पीएस. आय. मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘साहित्य संवाद ‘ पुस्तकाच्या परिसंवाद उपक्रमात पीएस.आय. मेजर नंदकुमार सैंदोरे बोलत होते.

प्रथम कर्मवीर पुतळा पूजन – अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्रतिष्ठान कार्याध्यक्षा सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी उपस्थितांचे सत्कार केले. लेखक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. याप्रसंगी श्रीराम अबॅकस क्लासच्या संचालिका प्रा.सौ. पल्लवी सैंदोरे, सौ. कुंदा तुळे, प्रथमेश जोर्वेकर,
नितीन जोर्वेकर, सौ.माधुरी जोर्वेकर, कु. ताराताई सैंदोरे,कु. आराध्या सैंदोरे, श्रीराम सैंदोरे, कार्तिक जोर्वेकर, कु.धनश्री सैंदोरे, निर्मिक उपाध्ये यांनी परिसंवादात भाग घेतला. सौ. सुनंदा वाघमारे, सौ. शोभाताई मोरे, श्रीमती सुमनबाई मांढरे, चेतन तुळे, सौ. श्रद्धा तुळे, सौ. प्रिया देवकर, कु. चैताली वाडेकर, प्रशांसा बारसे, पवित्रा बारसे, कु. सिद्धी बोरुडे, धनुष बोरुडे, ओम मोरे आदी उपस्थित होते. त्यांनी १२व्या वर्षातच निर्मिक उपाध्ये याने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार केला.
प्रमुख पाहुणे नंदकुमार सैंदोरे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या साहित्याचा आढावा घेऊन गेल्या पन्नास वर्षातील डॉ. उपाध्ये यांची साहित्यसेवा दिशादर्शक असल्याचे सांगितले. त्यांचा सत्तर वर्षाचा खडतर जीवनप्रवास म्हणजे ज्ञानसाधनेचा प्रवाह असल्याचे सांगून साहित्य संवाद हे पुस्तक त्याच वाटेवरचे सामाजिक समरसतेचे चिंतन आहे,असे स्पष्ट केले.ताराताई सैंदोरे म्हणाल्या, डॉ. उपाध्ये यांची सर्व पुस्तके वाचण्यात मला माणुसकीचा झरा मिळाला असे सांगून त्यांच्या साहित्याचा गौरव केला. नितीन जोर्वेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button