संविधान हीच आपली दिशा आणि शक्ती – प्रा. डॉ. जयपाल पाटील

पाली : भारतीय संविधान हे आपली शक्ती असून संविधानानेच आपल्याला योग्य दिशा दिली आहे. संविधानाचा सन्मान हा आपल्या लोकशाहीचा अभिमान आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले.
ग. बा. वडेर हायस्कूल व व. ग. ओसवाल ज्युनिअर कॉलेज, पाली (ता. सुधागड) येथे भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. जयपाल पाटील यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी कायम सुरक्षासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अपेक्षित ११२ क्रमांकाचा वापर करावा असे सांगून, पाटील पर्यटन शहर असल्याने अनेक वाहने येतात त्यांचे काही वेळा अपघाती होतात अशावेळी 108 रुग्णूबाई केला बोलावून मदत करावी, यासाठी सरकारकडून रोख बक्षीस आहे दिले जाते असे मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर आपला नावलौकिक निर्माण केला. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनीही मन लावून अभ्यास करावा आणि आपल्या शाळेचे, गुरुजनांचे, आई-वडिलांचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देण्यात आली. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. घोडके सर, उपमुख्याध्यापिका सौ. कुंभार मॅडम, पर्यवेक्षिका सौ. मराठे मॅडम, उपप्राचार्य श्री. पोटे सर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. काटकर सर यांनी केले.


