इतर

बीड मधील सरपंच हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या कोतुळ बंदचा फज्जा!

कोतुळ प्रतिनिधी

बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून कोतुळ (ता अकोले) येथे आज बुधवारी पुकारलेल्या कोतुळ बंदचा फज्जा उडाला

बुधवारी १ जानेवारीला नवं वर्षाच्या स्वागताच्या पहिल्या च दिवशी कोतुळ बंद ची हाक दिली होती
त्याशिवाय आज कोतुळ चा आठवडे बाजारही होता यामुळे या बंद बाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत बंद झुगारून लावला

सकाळी आठ वाजेपर्यंत व्यापारी ,नागरिकांची द्विधा मनसस्थिती होती मात्र त्यानंतर नागरिकांनी या बंदच्या हाकेला झुगारून आपापली दुकाने सुरू केली आज आठवडे बाजार असल्यामुळे बाहेरून अनेक व्यापारी, लहान- मोठे विक्रेते घेऊन आले होते बाहेरून आलेल्या बाजारकरू तसेच व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय सकाळी पाहायला मिळाली त्यामुळे बाजारात विस्कळीतपणा आला काही शेतकऱ्यांनी आठवडे बाजारात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना देऊन टाकला कोतुळ चा आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरतो हजारो लोक या दिवशी चाळीसगाव डांग ,कोतुळ परिसरातून बाजारसाठी येतात. मोठी आर्थिक उलाढाल या आठवडे बाजारात होते

आठवड्याभराच्या मजुरीतून आठवड्याचा भाजीपाला किराणा बाजारहाट खरेदी करून सायंकाळी लोक घरी परततात मात्र बंदच्या हक्केमुळे हा आठवडे बाजार विस्कळीत झालेला दिसून आला मात्र त्यानंतर बाजार सुरळीत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोतूळ ग्रामपंचायतने कोतुळ बंद बंदची हाक दिली लाऊडस्पीकर वरून बुधवार दि १ जानेवारी रोजी कोतुळ गाव बंद ठेवण्याचे कोतुळ ग्रामपंचायत ने लाऊड स्पीकर लावून नागरिकांना आवाहन केले होते मात्र ग्रामपंचायतचे बंदचे आवाहन हे बेकायदेशीर असल्याचा आरोप नागरिकांनी केला केला आहे

बंद साठी नियमावली हवीच…

एखाद्या सरपंचाची हत्या करणे हे नक्कीच निषेधार्थ आहे मात्र त्यासाठी निषेध सभा घेणे, निषेध मोर्चा काढणे यातून आपली भावना व्यक्त करणे अपेक्षित असताना
इतर जिल्ह्यातील एखादया घटनेवरून गावातील गोरगरीब जनतेचा प्रपंच आठवडे बाजारावर चालतो त्या च्या अन्नात माती कालवुन आठवडे बाजार बंद करून सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा निंदनीय प्रकार कोतुळ ग्रामपंचायतने केला आहे कोणीही येते गाव बंद करा म्हणते बंद बाबत नियमावली नाही व्यापारी व सामान्य माणूस यात भरडला जातो याबाबत वरिष्ठांकडे आपण पत्रव्यवहार करणार आहे

एक नागरिक ,कोतुळ

बीडच्या घटनेवरून गावकऱ्यांनी सरपंच, उपसरपंच यांना सांगितले होते . दवंडी देऊन गाव बंद ठेवा म्हणून दवंडी दिली. गाव बंद ठेवण्यासाठी वरिष्ठांचे कोणतेही आदेश नव्हते .वास्तविक निषेध सभा घेऊन निषेध व्यक्त करणे अपेक्षित होते

श्री शरद वावीकर

ग्रामविकास अधिकारी ग्रा.प कोतुळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button