वाकी (ता.अकोले ) येथील गरीब कुटुंबातील हॉटेल व्यवसायिकाला बायफ चा मदतीचा हात

अकोले (प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना स्वावलंबी बनवण्यासाठी ए.एस.के (ASK) फाउंडेशन पुरस्कृत आणि बायफ (BAIF) संचलित ‘समृद्ध किसान प्रकल्प’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याच प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्यातील वाकी येथील रहिवासी श्री. दत्तू कळू सगभोर या गरीब कुटुंबाला त्यांच्या हॉटेल व्यवसायासाठी नुकतीच आवश्यक साहित्याची मदत देण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी ए.एस.के. फाउंडेशन मुंबईचे सिद्धार्थ अय्यर व अरुण बांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बायफ संस्थेचे प्रदीप खोसे, सुधीर वागळे , सुरेश सहाने,यांचे मार्ग्दर्शानाखाली विष्णू चोखंडे, राम कोतवाल आणि निलेश अलवने ,मारुती सगभोर यांनी विशेष परिश्रम घेतले.
दत्तू सगभोर यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांना उपजीविकेचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. या मदतीमध्ये हॉटेल व्यवसायासाठी लागणाऱ्या ११ खुर्च्या, २ टेबल, पाणी जार, चंबू आणि थर्मास यांसारख्या साहित्याचा समावेश आहे. यामुळे या कुटुंबाला आता सन्मानाने स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना प्रकल्पाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, केवळ शेतीच नव्हे तर शेतीपूरक आणि सेवा क्षेत्रातील छोटे व्यवसाय (Non-farm livelihoods) सुरू करण्यासाठी प्रकल्प सतत प्रयत्नशील आहे. वाकी परिसरातील आदिवासी आणि दुर्गम भागातील कुटुंबांचे जीवनमान उंचावणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या मदतीबद्दल दत्तू सगभोर यांनी ए.एस.के फाउंडेशन आणि बायफ संस्थेचे आभार मानले आहेत. या साहित्यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडणार असून रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


