इतर

संगमनेर येथे सद्गुरु नारायण महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न;

​संगमनेर प्रतिनिधी

भारताच्या चारही दिशांना चार दत्त धामांची निर्मिती करणारे विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरु श्री नारायण महाराज तथा अण्णा महाराज यांच्या द्वितीय समाराधना दिनानिमित्त (पुण्यस्मरण) संगमनेर येथील आश्रमात सद्गुरू नारायण महाराज यांचे उत्तर अधिकारी सद्गुरू टेंभे स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. श्री नारायण महाराज श्री दत्त देवस्थान सेवाभावी ट्रस्ट, श्री क्षेत्र नारायणपूर व दत्त सेवेकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा उत्साहात पार पडला.

​संगमनेर कॉलेज समोरील निर्मलनगर, गुंजाळवाडी येथील सद्गुरु नारायण महाराज आश्रमात आयोजित या सोहळ्यात रुद्राभिषेक, भजन, सद्गुरूंचे जीवनदर्शन घडवणारी चित्रफित तसेच ह.भ.प. व्यंकटेश महाराज सोनवणे यांचे सुश्राव्य प्रवचन आयोजित करण्यात आले होते. महाआरतीनंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

​या पुण्यस्मरण सोहळ्यास विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील, सौ. नीलमताई खताळ, पतित पावन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एस. झेड. देशमुख सर, संगमनेर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, दानशूर व ज्येष्ठ नागरिक दगूभाऊ गुंजाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, विहिंप अहिल्यानगर विभाग सहमंत्री विशाल वाकचौरे, बजरंग दल विभाग संयोजक कुलदीप ठाकूर आणि विहिंप अकोले तालुकाप्रमुख गणेश धुमाळ यांच्यासह अकोले व संगमनेर प्रखंडातील बजरंग दल व विहिंपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नारायण महाराज दत्त देवस्थान सेवाभावी ट्रस्ट (नारायणपूर) संगमनेर, अकोले, सिन्नर विभागाचे प्रमुख श्री रवींद्र (बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दत्त सेवेकरी व निर्मलनगर, गुंजाळवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या भजन सेवेने आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत या मंगल सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button