इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि 01/01/2022

[

🙏 सुप्रभात 🙏


🍁 आजचे पंचांग 🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ११ शके १९४३
दिनांक :- ०१/०१/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०३,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति ०७:१८, चतुर्दशी २७:४२,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १९:१७,
योग :- गंड समाप्ति १३:५५,
करण :- विष्टि समाप्ति १७:३१,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१९:१७नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- धनु – पूर्वाषाढा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयदिन वर्ज्य दिवस,

राहूकाळ:- सकाळी ०९:४८ ते ११:१० पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२५ ते ०९:४८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५५ ते ०३:१८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:१८ ते ०४:४० पर्यंत,

❀ दिन विशेष:-
शिवरात्रि, इ.स. २०२२ प्रारंभ, भद्रा ०७:१८ नं. १७:३१ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ११ शके १९४३
दिनांक = ०१/०१/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका.

वृषभ
जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव येतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल.

मिथुन
आज कामाचा थकवा येईल. परंतु आळस झटकून कामाला लागावे. उगाच उदास होऊ नका. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका.

कर्क
उगाचच रेंगाळत बसून राहू नका. वेळेचा सदुपयोग करावा. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. आवडता छंद पूर्ण करता येईल. जुगारापासून सावध राहावे.

सिंह
मनात शंकेला थारा देऊ नका. सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. शैक्षणिक अडचणी दूर होतील. काही नवीन खरेदी करता येईल. घरात टापटीप ठेवाल.

कन्या
जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. दुचाकी वाहन जपून चालवावे. शंकेचे समाधान करून घ्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका.

तूळ
मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो. इच्छे विरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक गैरसमज टाळावेत.

वृश्चिक
अति संवेदनशीलता दाखवू नका. वाईट गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपलेच मत खरे कराल. नवीन मार्गांचा विचार कराल.

धनू
आजचा दिवस सामान्य असेल. भावांकडून मदत मिळेल. कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. मोहाला बळी पडू नका.

मकर
आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा. खरेदी करताना सावध राहावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. प्रवासात काळजी घ्यावी.

कुंभ
कार्यालयीन कामात गोंधळ उडू शकतो. चित्त स्थिर ठेवावे. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. एकावेळी अनेक कामे हाताळू नका.

मीन
भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल. नातेवाईकांची भेट आनंद देणारी असेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button