इतर

गणेशोत्सव व ईद च्या पार्श्वभूमीवर राजूर येथे पोलिसांचे रूट मार्च

विलास तुपे


राजूर/प्रतिनिधी

राजूर पोलिस स्टेशन हद्दीत आगामी गणेश उत्सव व मुस्लिम बांधवांच्या ईद चे पार्श्वभूमीवर राजूर एस टी बस स्थानक ,राहुल नगर ,ओम नगर,महादेव मंदिर, बाजारपेठ ,दत्त मंदिर या मार्गाने पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला. गुरुवार दि. 4 रोजी सायंकाळी 4 .30 ते 5 या दरम्यान घेण्यात आलेल्या सदर रूट मार्च दरम्यान 3 अधिकारी, 17 पोलीस अंमलदार, 23 होमगार्ड उपस्थित होते.

कायदा व सुवस्थेबाबत पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी पोलीस सज्ज असावे. याकरिता मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे , अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्यामार्गदर्शना खाली राजुर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे पोलीस उपनिरीक्षक विलास माळवदे, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

राजुर पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याबाबत नागरिकांना कळविण्यात बाबत त्यामुळे रूटमार्टचे आयोजन करण्यात आले होते.तसेच कोणी कायद्याचे उल्लंघन करू नये जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन राजुर पोलीस स्टेशनचे स पो नि. दीपक सरोदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button