रुंभोडी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे हस्ते भूमिपूजन

रुंभोडी प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रुंभोडी हे तालुक्यातील बाजारपेठेचे गाव ओळखले जाते यापूर्वी गावासाठी हनुमान मंदिराच्या सभामंडपाला शिवसेनेचे खासदार श्री भाऊसाहेब यांनी 2010 ला पाच लाखाचा सभा मंडपासाठी भरीव निधी त्यावेळी दिला त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार नुकताच प्रवरा नदीवरील अमृतेश्वर मंदिराच्या समोरील स्मशानभूमीच्या परिसरात सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी मंजूर झाला असून त्या कामाचे भूमिपूजन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी प्रमुख मान्यवर शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, सरपंच रवी मालुंजकर, कामगार पोलीस पाटील गोरक्ष शिंदे, सेवा संस्थेचे संचालक अतुल लोहटे, शिवसेनेचे कार्यकर्ते अजित हासे, सुभाष वाळीबा मालूजकर, जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोत, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे, अमोल बोऱ्हाडे, बन्सी मालुंजकर, अजित शिंदे,संदीप शिंदे, प्रभाकर वाकचौरे, अरुण वाकचौरे, नारायण वाकचौरे, भाऊराव गायकवाड,सुभाष पुरी,ग्रामसेवक दराडे, शांताराम मालुंजकर, मच्छिंद्र बर्डे, मोहन शिंदे, संतोष विष्णू मालुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी खासदार वाकचौरे म्हणाले की गावच्या विकासासाठी आम्ही कायम जनतेबरोबर आहोत यापूर्वी प्रथमता खासदार झालो त्यावेळेस पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठपुराव्यातून रुंभोडीच्या हनुमान मंदिराला सभामंडपासाठी पाच लाखाचा निधी दिला सभामंडपाच्या कामामुळे मंदिराच्या कामाला दिशा देण्याचे काम झाले त्यामुळे परिसराचा विकास झाला दिशा देण्याचे काम खासदार निधीच्या माध्यमातून मतदार संघात गावोगाव झाल्याचे त्यांनी सांगितले यामुळे ग्रामस्थांसह भाविक भक्तांची गैरसोय दूर झाली

खासदार वाकचौरे यांची अचानक भेट….
ग्राहकांच्या तक्रारीनंतर खासदार वाकचौरे यांनी अचानक सेंट्रल बँकेच्या शाखेला भेट दिली ग्राहकांच्या अडचणी बद्दल खासदार वाकचौरे यांनी शाखा व्यवस्थापक कांबळे यांना विचारणा केली असता की एक वर्षापासून फर्निचरचे काम स्थगित असल्याचे सांगितले त्यानंतर एटीएम सुविधा येथे नाही तेही लवकरात लवकर सुरू करण्याचे सांगितले बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्री राजू नयन यांनाही याबाबत त्यांनी सुनावले याबाबत सकारात्मकता दर्शवून लवकरच काम पूर्ण करून देण्याचे सांगितले
खासदार वाकचौरे यांनी मॅनेजर कांबळे यांना शेतकऱ्यांना व्यवसायिक उद्योजक व सर्वसामान्य लोकांना दर्जेदार व चांगले सेवा द्या अडचणी आणू नका उद्योग व्यवसाय प्रकरण तातडीने मंजूर करा हा निधी केंद्र सरकारचा आहे असे त्यांनी सांगितले सिबिल स्कोर बाबत उद्योग व्यवसायिक यांना सहकार्य करा असे सांगितले खासदार वाकचौरे यांनी अचानक बँकेस भेट दिल्याने त्यांच्या तत्परतेचे अनेकांनी कौतुक केले



