अकोल्यात भाजपा स्थापना दिन साजरा!

अकोले प्रतिनिधी
– ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस असून आज ६ एप्रिल निमित्ताने माजीमंत्री मधुकरराव पिचड ,भाजप अनुसूचित जन जाती मोर्चा चे राष्ट्रीय मंत्री तथा मानक आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार अकोले नगरपंचायत चे भाजपचे नवरसेवक तथा आरोग्य विभागाचे सभापती शरद नवले व विजय पवार यांच्या पुढाकाराने आज सम्पर्क कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा च्या झेंड्या जवळ श्रीफळ फोडण्यात आले.पुष्पगुच्छ वाहण्यात आले.
तसेच आरोग्य विभागाचे सभापती शरद नवले व नगरसेवक विजय पवार यांनी स्व खर्चाने 26 आरोग्य पुरुष कर्मचारी टी शर्ट चे व 36 महिला कर्मचारी यांना सन कोट मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी सर्व उपस्थितीतांना नाष्टा देण्यात आला.*आज भाजपा पक्षस्थापना दिवस नगरसेवक शरद नवले व विजय पवार यांनी यांच्या संपर्क कार्यालय येथे साजरा केला सर्व प्रथम भाजपा पक्षाचा झेंडा फडकवण्यात आला व नगरपंचायत पुरुष कर्मचाऱ्यांना टी शर्ट वाटप तसेच महिला सफाई कर्मचारी यांना सन कोट व टोपी आदी गोष्टींचे वाटप केले या वेळी राकेश देशमुख ,उदय काकड,कृष्णा हांडे, सागर झोळेकर, प्रदीप कदम ,विजय उगले,स्वप्नील धुमाळ(बाळा ),प्रसन्ना धोंगडे,सौरभ देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते
चौकट- अकोले नगरपंचायत च्या आरोग्य विभागाचे सभापती शरद नवले व नगरसेवक विजय पवार यांनी आम्हा सर्व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना टी शर्ट व सन कोट मोफत वाटप करून आमचा सन्मान केला.तसेच आमच्या कामाचे कौतुक केले.त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
आरोग्य कर्मचारी, अकोले नगरपंचायत
चौकट- अकोले तालुक्यात आज भाजपा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर भाजपा चा झेंडा फडकविला व अंगणात कमळ या चिन्हांची रांगोळी काढली.तर सोशल मीडियावर स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.