अकोले तालुका एज्युकेशन संस्थेतील घराणे शाही थांबवा! धरणे आंदोलन सुरू!
अभिनव व अगस्तीच्या ज्ञान मंदिरांतील घंटानाद वाढला
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुका एज्युकेशन संस्थेतील अनागोंदी थांबावी विश्वस्त निवडीतील घराणेशाही थांबवा संस्थेचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत ऑडिट करा अशा मागणीसाठी अकोले तालुका एज्युकेशन संस्था बचाव कृती समितीच्या वतीने आज अकोले धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली

आमदार डॉ. किरण लहामटे,ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे डॉ अजित नवले ,ज्येष्ठ नेते दशरथ सावंत , विजयराव वाकचौरे, मीनानाथ पांडे,, चंद्रकांत सरोदे सुरेश नवले विनय सावंत, बी जे देशमुख ,भानुदास तिकांडे, शांताराम गजे सदाशिव साबळे आदी या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत
आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी व चर्चा करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरजाजी बुवा जाधव हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले असता चर्चेदरम्यान आंदोलक आणि श्री जाधव यांच्यात वादाची ठिणगी पडल्याने चर्चा फिस्कटली यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले यामुळे संतप्त आंदोलकांनी संस्थेचे प्रमुख विश्वस्त असलेले माजी मंत्री मधुकरराव पिचड ,वैभव पिचड सिताराम पाटील गायकर हे आंदोलकांशी चर्चेला आल्याशिवाय कोणाशीही चर्चा करायची नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आणि आंदोलन धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आंदोलकांचा अपमान सहन करणार नाही असे यावेळी डॉ अजित नवले यांनी सांगितले तर तर आमदार डॉ लहामटे म्हणाले की तालुक्याच्या हितासाठी ही शिक्षण संस्था वाचविण्यासाठी आंदोलन सुरू आहे संस्थेतील

घराणेशाही बंद झाली पाहिजे, शिक्षण संस्था राजकारणाचा अड्डा झाली आहे संस्थेचे होणारे नुकसान थांबावी यासाठी आंदोलन हाती घेतले मात्र हे आंदोलन उधळून लावण्याचा डाव आहे म्हणून आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी अशी माणसे पाठवली असा आरोप केला यामुळे प्रमुख विश्वस्त व सर्व विश्वस्त चर्चेला आल्याशिवाय चर्चा न करण्यावर आंदोलक ठाम राहिले व आंदोलन सुरूच ठेवले चर्चेतून मार्ग न निघाल्यास दुसऱ्या टप्प्यात संस्थेच्या कार्यालयात टाळे ठोकून ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा यावेळी इशारा आंदोलकांनी दिला
कडक उन्हाळ्याचे तप्तते बरोबर गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील राजकारण ढवळून निघाले आहे अकोले तालुका शिक्षण संस्थे बरोबरच अभिनव शिक्षण संस्थेतील अध्यक्षपदी सुरेशराव कोते यांची निवड झाल्याने त्यांना खाली खेचण्यासाठी मधुकर नवले यांनी अभिनव शिक्षण संस्थेच्या विश्वस्त पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला मात्र अभिनव चे अध्यक्ष सुरेशराव कोते यांनी मधुकर नवले यांनी अभिनव चा लावलेला निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर असल्याची हरकत नोंदवत या निवडणूक कार्यक्रमाला न्यायालयात आव्हान दिले आहे यामुळे एकीकडे अकोले तालुका एज्युकेशन संस्था तर दुसरीकडे अभिनव शिक्षण संस्था सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे
