इतर

श्रीकृष्णचरित्रातील गोपालकाला म्हणजे समतेची व सदगुणांची जोपासना : हभप आचार्य शुभम महाराज कांडेकर


श्रीरामपूर /दि १६मार्च २०२६

संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, सर्व संतसाहित्य, अर्वाचीन साहित्य हे आपल्या जीवनाचे संचित आहे. जी लिहिली जाते, तीच परंपरा टिकते,अशा लेखनानातून प्रबोधनाची ज्योत प्रज्वलित राहते. याच वाटेवर श्रीकृष्णचरित्रातील गोपालकाला म्हणजे समतेची व सदगुणांची जोपासना होय, हे सूत्र लक्षात घ्यावे, असे आवाहन हभप आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी केले.
श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रमामधील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात दि. ०९ ते १६मार्च २०२६ या काळात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सप्ताहाच्या सांगता काल्याच्या किर्तन प्रसंगी हभप आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर बोलत होते.

याप्रसंगी प्रथम मूर्तीपूजन करण्यात येऊन संतपूजन करण्यात आले.. स्वागत, प्रास्ताविक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले. आश्रम प्रमुख सुभाष वाघुंडे,सचिव सौ. कल्पनाताई वाघुंडे, शिरीष वाघुंडे यांनी नियोजन करून संतपूजन करुन,सप्ताह काळातील सहकारी संतजनांचा सन्मान महारांजाच्या हस्ते केला.

माजी प्राचार्य टी.ई. शेळके, माजी नगराध्यक्षा सौ. इंदुमती डावखर,ज्येष्ठ साहित्यिक सुखदेव सुकळे, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण,किसनराव निकम, सुभाष जोर्वेकर, माजी मुख्याध्यापक भागवत मुठे, भीमराज कटारे, बाबासाहेब उगलमुगले, रामेश्वर भोर, रंगनाथ बकाल, तात्याबा राऊत, विलास थोरात, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण सूर्यवंशी, सुरेश गिरमे,पत्रकार राजेंद्र देसाई,माऊली वृद्धाश्रमाच्या उपाध्यक्ष अरुण विसपुते, सौ. वंदना विसपुते, सौ. गौरी वाघुंडे, दिलीप गिरमे, दीपक सोनार, शुभम नामेकर, दत्तात्रय खिलारी, संतोष भालेराव, नलिनी गिरमे आदी उपस्थित होते. उज्ज्वला भोसले, मोनिका भोसले, व्यासपीठ संचालक हभप शरद राजवळनाना, गायनाचार्य हभप विजय महाराज शिंदे, हभप सुधाकर महाराज लोंढे, हभप अकोलकर महाराज,हभप दिगंबर मैड महाराज, हभप रामकिसन देवरे महाराज, सुरेश गड्डे गुरुजी, आदित्यअण्णा गांगुर्डे, बाबासाहेब उफाड,एकनाथनाना राऊत, रावसाहेब ढोकचोळे, अमर अप्पा ढोकचौळे,अप्पासाहेब माकोणे, कुणाल महाराज बोल्हे, भैरवनाथ कुमावत आदिंचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सूसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button