इतर

अमरावती येथील बालकाच्या डोळ्यात अश्रू पाहून मुंबईमध्ये आ.लंके झाले भावनावश !

कु.तेजस या बालकास स्वतःच्या ताटात जेवू घालत दिला मोबाईल भेट !

मुंबई प्रतिनिधी :
आपल्या सामाजिक व परोपकारी कार्यामुळे अल्पावधीतच पारनेर नगर मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञात झालेले पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे आणखी एक सामाजिक रूप मुंबईकरांना पहावयास मिळाले .


कु .तेजस सुशील गभने तालुका तिवसा , जिल्हा अमरावती येथील गरिब घरातील मुलगा दिनांक 1 मार्च 2023 रोजी आमदार निलेश लंके यांना आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी रात्री एकटा बसलेला पाहिला .त्याच्या डोळ्यात अश्रू व चेहऱ्यावर गंभीर चिंता दिसत होती .आमदार लंके यांच्या नजरेतून तो सुटला नाही त्यांनी त्याला जवळ बोलावून त्याची विचारपूस केली असता त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचे ऑपरेशन साठी वडीलासोबत मुंबईला आलेला आहे .असे सांगितलेले व जेवण केल का विचारल्यावर वडील जेवण आणायला गेलेत व त्यांना जावून दोन तास झाले असे सांगितल्यावर आमदार साहेबांनी लगेच त्याच्यासाठी जेवण मागविले व त्याला पोटभर जेवू घातले . अधिक चौकशी केली असता मुलगा शाळेत खुप हुषार आहे डोक्याला मार लागल्या मुळे ऑपरेशन साठी मुंबईला आला वडील जेवण आणायला गेले 2/3 तास झाले वाट बघतोय पण आले नाही आणि माझ्याकडे फोन नाही . नाहीतर फोन केला असता असे ऐकल्यावर आमदार साहेब अतिशय भावना विवश झाले .आपल्या मतदार संघाबाहेरील हा मुलगा आहे परंतु तो आज अडचणीत आहे येथे नेहमीच्या सवयीप्रमाणे माझा परका हा भेदभाव न करता त्या रडणाऱ्या मुलाला समजावताना आमदार निलेश लंकेही भावनावश झाले भूक लागली असताना वडिलांना फोन नसल्यामुळे उपाशी तापाशी तो मुलगा तिथं बसला ही खुप वेदना दायक घटना घडली . साहेबांनी त्याला विचारले तुला मोबाईल घेवुन देवु का यावर तो लहान मुलगा काहीच बोलला नाही . पण नेत्यांनी सोबत असणाऱ्या सहकाऱ्याना दुसऱ्याच दिवशी मोबाईल आणून त्या लहान मुलाला द्यायला सांगितला .संधी साधून राजकारण करणाऱ्या इतर नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा प्रकार मुंबई येथील आकाशवाणी आमदार निवास येथे अनेक नेतेमंडळींनी पाहिला व आ . निलेश लंके यांची ओळख महाराष्ट्रात का झाली याबद्दल चर्चा करत आमदार लंके यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक मुंबईमध्ये झाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button