पुण्यात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात पालखी व कीर्तन सोहळा

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात युवा कीर्तनकार युगंधरा पाध्ये हिने कीर्तनातून राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज व पांडुरंग भक्त सावता माळी याचे विचार विद्यार्थिनी समोर मांडले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे इचलकरंजी सभागृह विद्यार्थिनींनी खचून भरून गेले होते. कष्ट करा, सचोटीने वागा आणि जीवनात प्रगती करा, असे तुकडोजी महाराजांनी सांगितले असल्याचे तिने अभंगातून मांडले. देव हा घामाच्या नदी किनारी राहतो आणि कष्टाच्या घामातूनच माणसाला देवत्व प्राप्त होते असे विचार तिने सांगितले. त्याचबरोबर रामदास स्वामींच्या आयुष्यातील उदाहरणे, सावता माळी, संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यातील अनेक दाखले देत तिने भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सावता माळी शेतात सतत काम करायचा. विठ्ठलावर त्याची खूप भक्ती होती. विठ्ठल फक्त पंढरपूरच्या मंदिरात नसून चराचरात आहे, असे सांगितले. देव मूर्तीत नसून माणसात आहे.
भक्ती फक्त दाखवायची नसते ती करायची असते असे आवर्जून सांगितले.

तिला हार्मोनियमवर श्रीरंग आठवले आणि तबल्यावर ओम दाणे यांनी साथ केली.
कीर्तनापूर्वी सर्व मुलीं पालखी सोहळयात अतिशय उत्साहात व आनंदात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमा प्रतिमा पूजनाने झाली. व सांगता पांडुरंग रंगाच्या आरतीने झाली.
वसतिगृह प्रमुख सुमन तांबे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. रुक्मिणी बागुल यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहातील विद्यार्थिनी भाग्यश्री मानकर आणि दिशा अडसूळ यांनी केले. कार्यक्रमाला वसतिगृहातील व बालगृहातील सर्व विद्यार्थिनी तसेच सर्व स्टाफ उपस्थित होता उपस्थित होत्या.




