जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान्हेरे येथे शिक्षण परिषद
प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव
अकोले तालुक्यातील केंद्र शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान्हेरे येथे तिसरी शिक्षण परिषद पार पडली. सर्वांचे उपस्थितीत सरस्वती मातेच्या फोटोला हार अर्पण करून शिक्षण परिषदेला सुरुवात करण्यात आली.
श्री अर्जुन तळपाडे सर यांनी वाचन संस्कृती या विषयावर तासिका घेतली त्यावेळी ते म्हणाले,” आठवड्यातून बुधवार आणि शनिवार विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार साहित्य उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर यामध्ये शिक्षक,पालकांचा सहभाग असावा. दररोज 15 मिनिटे वाचन घेण्यात यावे. वाचन डायरी तयार करावी तसेच वाचन कोपरे देखील तयार करावेत. अचूक वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वांसमोर कौतुक करावे. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी पुस्तकाचे वाचन करावे.जेणेकरून विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करतील.वाचनाने विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढतो त्याचबरोबर विद्यार्थी घडतो आणि प्रश्नाची उत्तरे सोडवण्यास वाचनाने मदत होते.कुसुमाग्रज वाचन अभियानात आठवड्यातून दोन दिवस घेत असताना सकाळी साडेआठ ते दुपारी दीड पर्यंत विद्यार्थ्यांना वाचण्यास सांगावे. विनोबा ॲप विद्यार्थ्यांना वापरायला सांगावे.निपुण मिशन अहिल्यानगर नोव्हेंबर 26 पर्यंत सर्व वर्ग शंभर टक्के निपुण करावेत. त्यामध्ये भाषा व गणित या दोन विषयांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा. विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन प्रपत्र तयार करावे . एकूण पटा पैकी 80 टक्के विद्यार्थी यांनी क्षमता प्राप्त केल्या पाहिजेत,तेव्हा शाळा सुपरनिपून बनते.
केंद्रप्रमुख माननीय श्री राम मोहोळ यांनी शिक्षकांना संबोधित केले त्यावेळी ते म्हणाले,” विद्यार्थी शिकतो कसा याकडे लक्ष दिले पाहिजे.मुलांना शिकण्यास आव्हान देणे गरजेचे आहे. दोन्ही विषयांमध्ये विद्यार्थ्याने शंभर टक्के क्षमता प्राप्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. ज्या विषयात विद्यार्थी मागे आहे त्याच्यासाठी विशेष साहित्य वापरून, जादा तासिका घेऊन त्याच्या क्षमता वाढवल्या पाहिजेत.विद्यार्थी केंद्रित अनुभवात्मक शिक्षण पद्धती यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा.विद्यार्थी कसा शिकतो याचे चिंतनशील निरीक्षण शिक्षकांनी केले पाहिजे . त्याचा स्तर कोणता आहे याचा आढावा घेऊन कृती कार्यक्रम घेतला पाहिजे. मला ज्ञान मिळवायचे आहे म्हणून विद्यार्थ्यांनी हेतू पुरस्कर वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गोष्ट रुजवणे शक्य करण्यासाठी त्रास सहन करावा. कुसुमाग्रज वाचन अभियान व मिशन आरंभ तासिका घेणे बंधनकारक आहे.जर तसं तो शिकत नसेल तर सक्रिय उपयोजन करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी आपली कल्पकता वापरावी.”
श्री रमाकांत भागडे यांनी पी.जी. आय. का गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच श्री युवराज तळपे सर यांनीही शिक्षक बंधू भगिनींना शिक्षण पद्धती बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी श्री युवराज तळपे, श्री राघू भांगरे,श्री विठ्ठल कवटे.श्री मच्छिंद्र खाडे.श्री रघुनाथ वायाळ.श्री अर्जुन भांगरे. श्री दशरथ सोंगाळ.सौ इंदिरा सगभोर,श्रीमती माधुरी बोरसे,श्रीमती मनीषा आवारी,श्री सुरेश पवार,श्रीमती योगिता येलमामे, श्री तुकाराम बेनके,श्री बाळासाहेब दातीर, श्रीमती रोहिणी नवाळी,श्रीमती सविता शिंदे, श्री रमाकांत भागडे, श्री गणपत उघडे, श्रीमती यशोदा ढगे, श्री भिमा कोकतरे, श्री सोमनाथ धिंदळे, श्री लक्ष्मण मुठे,श्री तुकाराम मधे,श्री भरत सुकटे, श्री गिरीधर सारूक्ते, श्री दीपक साळवे, श्री अर्जुन बांबेरे,श्री पांडुरंग खाडे,श्री रामनाथ मुठे, श्री देवराम बांडे,श्री राजेंद्र देशमुख व महादर्पण चे प्रतिनिधी श्री संतु जाधव सर आदी शिक्षक – शिक्षिका उपस्थित होते.
शेवटी श्री गणपत उघडे सर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले



