श्री शिवाजी हायस्कूल तुळस, तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

संजय उकिरडे/ प्रतिनिधी
दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी श्री शिवाजी हायस्कूल तुळस, तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती सोहळा उत्साहात संपन्न.
याप्रसंगी सूत्रसंचालन व अध्यक्षीय निवड श्री घोडे बी.बी. यांनी केले अनुमोदन सौ तुळसकर संजना मॅडम यांनी केले सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन होऊन सुमधुर संगीत साथीने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कोल्हे व्ही.एच.यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना शाखेचे 1957 ते आज 2026 पर्यंत श्री देव जैतिराश्रित संस्था,ग्रामपंचायत,थोर देणगीदार,यांचे सहकार्याने चाललेली वाटचाल आणि सध्या विद्यालयात चाललेले नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यालयाचा भौतिक व गुणवत्तापूर्ण विकास याची माहिती देत पाहुण्यांचं स्वागत केले.विशेष उपक्रमामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन केले त्यात एक आगळीवेगळी स्पर्धा बुके कॉम्पिटिशन या कार्यक्रमानिमित्ताने घेण्यात आली विद्यार्थ्यांनी परिसरातील पानाफुलांचा वापर करून सुंदर सुंदर बुके तयार केले होते.ज्यात कलात्मकता, नवकल्पना आकर्षकता अशा विविध गुणांना चालना दिली गेली.बचतीचा एक संदेश देखील दिला गेला.

या स्पर्धांमधून प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी, व एसएससी परीक्षा मार्च 2026 मध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी संस्कृती तुळसकर, प्रतीक परब व धनराज पायनाईक या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण झाले.
विद्यार्थी मनोगतात स्वरा शंकर घारे व संजीत संदीप तुळसकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सरपंच रश्मी परब, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संदीप पेडणेकर, श्री देव जैतिराश्रित संस्था अध्यक्ष विष्णूजी परब यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख वक्ते म्हणून श्री सानप प्रवीण मालोजी यांनी कर्मवीरांच्या जन्मापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असलेली महती विषद करताना आजपर्यंत अनेकांनी न ऐकलेल्या परंतु समाजाला जागृत करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टींचा उल्लेख करताना कर्मवीरांची एकमेव जयंती कशी आगळी वेगळी आहे याविषयी महत्त्व सांगितले.

अध्यक्ष मनोगतात या विद्यालयातील माजी शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कारकीर्द करत रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदी कार्य केलेल्या डिसोझा अँथोनी साहेब यांनी कर्मवीरांची,रयत शिक्षण संस्थेची महती विषद करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले आणि समाजाची व ग्रामस्थांची रयत शिक्षण संस्थेत प्रती असणारी जबाबदारी देखील त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात दिवंगत शाळा समिती सदस्य माननीय सगुणजी माळकर यांची कन्या प्राध्यापक आकू सगुण माळकर व पांडुरंग परब यांचे संयुक्त विद्यमाने जीजी माळकर यांच्या हस्ते विद्यालयातील दोन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक खर्च प्रत्येकी चार हजार प्रमाणे एकूण आठ हजार रुपये प्रदान करण्यात आले तसेच श्रीदेव जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विष्णू परब यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.शेवटी सौ नाईक सोनाली यांनी सर्वांचे आभार मानले.
पंचायत समिती सभापती शंकरजी घारे यांनीही कार्यक्रम प्रसंगी भेट दिली . तसेच इतर मान्यवरांत माननीय श्री मंगेश राउळ, श्री जी जी माळकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ अस्मिता कुंभार, सौ भूमिका मांजरेकर,सौ तेजस्विनी ठुंबरे, सौ समीक्षा कुंभार, तसेच माजी शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा सौ नेत्रा सावंत याही उपस्थित होत्या. विद्यालयातील सेवकवृंद संदीप तुळसकर, घोडे बी.बी. सौ नाईक एस पी, श्री सानप एस पी, सौ तुळसकर एस.एस., सौ चव्हाण ए बी, सौ तुळसकर डी आर, श्री तुळसकर समीर, श्री तुळसकर मयूर व सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने उत्साहात हा जयंती सोहळा संपन्न झाला.



