आजचे पंचांग व राशिभविष्य दि०९/०९/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १८ शके १९४६
दिनांक :- ०९/०९/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३५,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति २१:५४,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति १८:०४,
योग :- वैधृति समाप्ति २४:३२,
करण :- कौलव समाप्ति ०९:००,
चंद्र राशि :- तुला,(११:२९नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वैधृति वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१७ ते ०७:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३१ ते ०५:०३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०३ ते ०६:३५ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
श्री बलराम जयंती, सूर्यषष्ठी, कार्तिकेय दर्शनाने पापनाश, घबाड १८:०४ प., यमघंट १८:०४ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १८ शके १९४६
दिनांक = ०९/०९/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
अनीतिचा मार्ग अवलंबू नका. साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.
वृषभ
मनातील शंका काढून टाकाव्यात. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. धीराने कामे करावीत.
मिथुन
घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकार्यांचा पाठिंबा मिळवाल. जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतीत कराल.
कर्क
योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल. कार्यालयातील सहकारी सहकार्य करतील. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल.
सिंह
कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते. सर्वांशी गोडीने वागाल.
कन्या
विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. सोप्या वाटणार्या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहावे. आपण आणि आपले काम एवढेच पहा.
तूळ
घरातील कार्य मार्गी लागतील. कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. जुने वाद मिटू शकतील.
वृश्चिक
गुंतवणुकीसाठी योग्य काळ. पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मक विचार करावा. मानसिक प्रसन्नता लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन विचार घेऊन जाल.
धनू
उद्योगात जोखीम पत्करून काम करावे लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा. कौटुंबिक समस्या धीराने सोडवा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.
मकर
जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च कराल. भागिदारीतून लाभ मिळेल. कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. वादाचे प्रसंग टाळावेत. एखादी सकारात्मक वार्ता मिळेल.
कुंभ
कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला सुखद दिवस. नवीन ओळख होईल. वडीलांचे मार्गदर्शन घ्यावे. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
मीन
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. कामातील काही समस्या सुटतील. बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर