स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२

खिरविरे येथील
तीर्थाचीवाडी शाळेतून

नरेंद्र राठोड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीर्थाचीवाडी येथे शाळेच्या रौप्य महोत्सवी निमित्त अनेकांनी मदतीचा हात दिला तसेच कौतुकाची थाप दिली त्याबद्दल आभाराचे दोन शब्द_
शाळेतील ध्वजस्तंभ व ध्वज बांधकाम निधीसाठी लाडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक तुकाराम डगळे यांनी रोख रक्कम 11, 151 रुपये सुपुर्द केले त्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संजय गणपत डगळे व मुख्याध्यापक श्री. दिगंबर वाकळे सरयांनी त्यांचे आभार मानले शाळेस साऊंड सिस्टिम साठी अंदाजे दहा हजार रुपये किमतीचे अनुदान शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस सौ.जिजाबाई दिलीप डगळे यांचे बंधू कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मुंबई स्थित श्री.रोहित विठ्ठल धनगर यांनी रोख रक्कम स्वरूपात दहा हजार रुपये दिले. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांच्याही मनःपूर्वक आभार व स्वागत. तसेच रोटरी क्लब अकोले अंतर्गत ₹ १२०००/- किमतीचे मोफत फक्त त्यासाठी तीन हजार रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे सर्व माजी विद्यार्थी व नोकरी करत असलेल्या बांधवांना आव्हान करण्यात आले होते.त्यापैकी आज रोख रक्कम ₹ 4000/- प्राप्त झाल्याबद्दल सर्व देणगीदारांचे 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त शाळेचे व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तीर्थाचीवाडी च्या वतीने हार्दिक आभार सत्कार करण्यात आला आणि असाच मदतीचा ओघ कायम मिळत राहो असे आव्हान करण्यात आले आणि सर्व देणगीदार याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी अनेक दानशूर ऑनलाईन स्वरूपात देणगीदार यांचे शाळेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन खूप खूप धन्यवाद देऊन करत असलेल्या मेहनतीसाठी दोन्ही शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले…
शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सुसज्ज लायब्ररी…
शालेय परसबाग विशेष आकर्षण…
शाळेत पहिल्यांदाच होत असलेला झेंडावंदन पाहून सर्व पालक आणि विद्यार्थी भारावून गेले होते.
अकोले दर्शन घडवणारे चित्र प्रदर्शन, सर्व संत नेत्यांचे फोटो असलेला प्रदर्शन वर्ग, तसेच इयत्ता चौथीच्या इतिहासातील सर्व गड-किल्ल्यांचा उल्लेख असलेला प्रदर्शन वर्ग या दोन्ही वर्गांचे या ठिकाणी कोविड १९ चे सर्व नियम पाळून उद्घाटन करण्यात आले.माजी विद्यार्थी यांना ऑनलाईन स्वरूपात
स्पर्धा परीक्षा तसेच करियर समुपदेशन/मार्गदर्शन करण्यात आले…
स्पर्धा परीक्षा अभ्यास… यात शालेय विद्यार्थ्यांचे बालपण हरवले आहे, ….
खेळ, गाणी, गोष्टी, गप्पा, सिनेमा… असे भरगच्च उपक्रम राबवत…. मुलांना त्यांचे बालपण देणारी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्नशील असेल असे वैशिष्टयपूर्ण ज्ञानतीर्थ सुरू आहे.
जागेपणी भव्य स्वप्न बघून ते सत्यात येईपर्यंत आपण अत्यंत मन लावून ताकदीने एकजुटीने काम करतआहे करत राहू!