इतर

पारनेरमध्ये महात्मा फुलेंना स्मृतीदिनी अभिवादन

पारनेर दि. २८ पारनेर प्रतिनिधी.

सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी पारनेर शहरात त्यांच्या कार्याला आदराने अभिवादन करण्यात आले.शहरातील पूर्णाकृती पुतळ्यास सावित्री फातेमा सदभावना मंच पारनेर शहराच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.


महात्मा फुलेंनी स्त्री-शिक्षणासह समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या अभिवादन कार्यक्रमा साठी सदभावना मंचाचे प्रवर्तक कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद, अध्यक्ष ह. भ. प किसनराव पावडे, सचिव भाऊसाहेब औटी, ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे,मारुती शेरकर (सर), दत्तात्रय घोडके, भिकाजी जगदाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर,शाहीर गायकवाड, माजी नगरसेवक डॉ. मुद्दसर सय्यद, सलीम शेख, राजु भाई शेख, बाळासाहेब शेटे, पत्रकार श्रीकांत चौरे, ईश्वर भोसले, भगवान नगरे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुलेंच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले आणि त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेतली. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले, तसेच अस्पृश्यता निवारण आणि समानतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी स्मरण करण्यात आले.

हा कार्यक्रम महात्मा फुलेंच्या प्रेरणादायी जीवनाचे व कार्याचे स्मरण करणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button