आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२६/०८/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०४ शके १९४६
दिनांक :- २६/०८/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४७,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति २६:२०,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति १५:५५,
योग :- व्याघात समाप्ति २२:१७,
करण :- बालव समाप्ति १४:५६,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- मंगळ – मिथुन १५:२२,
शुभाशुभ दिवस:- दु. ४नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:४९ ते ०९:२३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१५ ते ०७:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३९ ते ०५:१३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१३ ते ०६:४७ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
श्रीकृष्ण जयंती (जयंती योग), कालाष्टमी, मन्वादि, शिवमुष्टि (जवस),
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०४ शके १९४६
दिनांक = २६/०८/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्यांशी मतभेद संभवतात.
वृषभ
कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल. सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.
मिथुन
संभ्रमात अडकून राहू नका. विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत.
कर्क
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल. नातेवाईकांची गाठ पडेल. दिवस शुभ फलदायी ठरेल.
सिंह
व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. अनामिक भीती लागून राहील. कठोर मेहनत घ्यावी लागेल.
कन्या
बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. हाती घेतलेल्या कामात यश येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामाचे योग्य नियोजन करावे. अति श्रमाचा थकवा जाणवेल.
तूळ
प्रकृतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवास काळजीपूर्वक करावा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.
वृश्चिक
प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्यांशी मतभेद होण्याची शक्यता. सरकारी कामे अडकण्याची शक्यता. निराशाजनक विचार टाळा.
धनू
घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल. जुनी येणी प्राप्त होतील. घरगुती प्रश्न लक्षात घ्या.
मकर
भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. पैज जिंकता येईल.
कुंभ
मानसिक स्थिती भक्कम करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुलभ असेल. महिला वर्गासाठी विशेष दिवस.
मीन
बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. पथ्यपाणी वेळेवर सांभाळा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर