इतर

जेष्ठ नागरिकांना व्यंगचित्रांतून लाभले हास्याचे विनोदी क्षण


संगमनेर – ” या जगात तुमचे नैराश्य समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही, नैराश्य आणि अपयश याला कुणीही मित्र नाही. अशावेळी तुमच्यात एखादी कला असणे गरजेचे आहे आणि कला व पुस्तके हि तुमच्यातील नैराश्य दूर करण्यास नक्कीच मदत करेल. कधी कधी तुमच्याकडे इतका पैसा जमा होतो कि एव्हड्या पैश्याचे करायचे काय? असा प्रश्न तुम्हाला पडतो. अशावेळी दुसऱ्याला काही तरी देण्याची प्रवृत्ती आपल्यात असणे हा सर्वात मोठा गुण आहे. पैश्याचे आर्थिक नियोजन करणे आणि जीवनात हास्यनिर्माण करून आनंदी , सकारात्मक आणि निरोगी राहणे खूप गरजेचे आहे, तरच तुमचे जीवन अनमोल होईल” असे विचार प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि व्याख्याते अरविंद गाडेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी अरविंद गाडेकर यांनी व्यंगचित्रातून व विनोदातून प्रबोधन करीत आणि मार्मिक चिमटे काढीत सर्व उपस्थित जेष्ठ नागरिकांना खूप हसविले. सोशलमीडियाचा गैरवापर आणि सामाजिक समस्येवर भाष्य करणारी व्यंगचित्रे उपस्थितांना भावली.
राजहंस जेष्ठ नागरिक संघ आणि जेष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे ‘जीवन अनमोल आहे आणि व्यंगचित्रातील विनोद’ या विषयावर सुंदर व्याख्यान नेहरू गार्डन येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ कळसकर गुरुजी होते. व्यासपीठावर राजहंस जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.जी.पी.शेख तसेच जेष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संघाचे अध्यक्ष पगारे सर , व्यंगचित्रकार व प्रमुख व्याख्याते अरविंद गाडेकर हे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सोमनाथ कळसकर गुरुजी म्हणाले ,”आज चारही जेष्ठ नागरिक संघाला हे विरंगुळा केंद्र मिळाले आहे त्याचा योग्य वापर आणि उपयोग सर्वाना होत आहे. येथील सर्व कार्यक्रम स्तुत्य आहेत आणि जेष्ठ नागरिकांना दिलासा देणारी आहेत.”
या कार्यक्रमात ज्या जेष्ठांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ .जी.पी.शेख यांनी केले , प्रकल्प प्रमुख बाळकृष्ण महाजन , सरचिटणीस नंदकिशोर बेल्हेकर , कार्यकारी प्रभारी अध्यक्ष सतीश घबाडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमास रमेशकाका सराफ, ज्ञानेश्वर गोंटे, गोडसे , शेख इद्रिस , सय्यद आसिफअली , खारके सर , कानवडे सर, तिवारी साहेब, श्रीमती काळे, सौ. पवार, दत्तात्रय जोशी, यादव , नवले सर आणि दोन्ही जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार बाळकृष्ण महाजन यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button