अवयव’ दान करुन ‘जीवनदान’ देणा-या नातलग दात्यांचे ‘सन्मान’…!

.
‘
सोलापूर – ‘रक्तदान’ चळवळ हे सर्वश्रुत आहे. परंतू, ‘अवयवदान’ करण्याची काळाची आवश्यकता आहे. अवयवदानाबाबतही चळवळ, जनजागृती आणि प्रसार होण्याची अत्यंत महत्वाचे आहे. कारण, अवेळी जेवण, जंकफूड आधी कारणाने माणसाच्या शरीरातील अवयव खराब होतात. यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याने अनेकांना अवयवाची अत्यंत गरज भासते. अवयवदान करण्याचे प्रमाण खूप कमी आहे. एखाद्याचे अचानकपणे मृत्यू झाल्यास अग्नीसंस्कार किंवा दफनविधी केल्यानंतर काय मिळेल.? अचानकपणे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे ‘अवयवदान’ केल्याने एखाद्याचे जीव वाचवू शकतो. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे ‘अवयव’ किमान आठ – दहा गरजूंना फायदा होऊन त्यांच्या रुपात आपल्या स्वकीयांना पाहिल्याचे समाधान आणि यापेक्षा मोठे पुण्य काम कुठलेही नसेल.
‘महर्षी मार्कंडेय महामुनी रथोत्सव’ आणि ‘जागतिक अवयव दान’ दिनानिमित्त रविवार, दि. १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४. ०० वाजता कन्ना चौकाजवळील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय येथील विणकर सभागृहात अवयव दान करणा-या नातेवाईक दात्यांचे सन्मान सोहळ्याचे आयोजन सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि पद्मशाली सखी संघमच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम व सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी दिले आहे.
याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन फाउंडेशनचे गौरीशंकर कोंडा, नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, सुकुमार सिध्दम, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, सतीश चिटमील, वैकुंठम् जडल, श्रीनिवास पोटाबत्ती, सखी संघमच्या ममता मुदगुंडी, पूजा चिप्पा, मंजुळा आडम, कल्याणी पेनगोंडा, ममता तलकोकूल, कला चन्नापट्टण, गीता भूदत्त, सपना मिठ्ठापल्ली, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, विद्या श्रीगादी यांच्यासह आदींनी केले आहे.



