पिंपळदरी आश्रमशाळेत कर्मवीर जयंती निमित्त सर्व रोग निदान शिबिर संपन्न

अकोले प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138 व्या जयंती सोहळा निमित्ताने, कर्मवीर भाऊराव पाटील आश्रम शाळा पिंपळदरी ,समस्त ग्रामस्थ पिंपळदरी व शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत पिंपळदरीच्या सरपंच सुनीताताई मांडे , डॉ. शिवाजी खेमनर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन रंधे ,सोसायटीचे चेअरमन प्रदीप मांडे ,माजी सरपंच पंढरीनाथ रंधे ,संचालक दत्तात्रय रंधे ,उत्तम जाधव ,सचिव गणेश रंधे ,सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब मांडे ,रमेश नेपाळे, दत्तात्रय फापाळे, येडू माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बर्डे ,उपाध्यक्ष संजय रंधे, विश्वस्त सुनील रंधे यांच्या हस्ते करण्यात आले .

डॉक्टर शिवाजी खेमनर जनरल सर्जन यांनी पिंपळदरीतील 87 रुग्णांची तपासणी करून मोफत औषध उपचार केले . या शिबिरासाठी परिसरातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील आश्रम शाळेतील 200 विद्यार्थ्यांची व रूग्णांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली .

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक धनंजय मलाव, राधेश्याम जगधने ,मंदा घुले ,संगीता आंबरे,भाऊसाहेब राऊत ,शितल गिरी ,शंकर कडाळे ,उन्नती वाघ ,विठ्ठल चौधरी ,अशोक कोरके ,योगेश येवले ,भाऊसाहेब कासार, ज्ञानदेव फापाळे ,छाया ठोकळ, मंगेश निकम ,भटू नागमल ,प्रमोद कोल्हे ,बाबासाहेब नरळे ,मारुती कुदळे ,दत्तात्रय जाधव ,अलका गुळवे ,पुष्पा शिंदे, कुणाल घोडके, बाळू जोरवर ,लक्ष्मण खंडागळे यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शेळके यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील डोळस यांनी मानले.




