इतर

पिंपळदरी (ता अकोले)  येथील आश्रमशाळेतील गरीब विद्यार्थ्यांना राजेंद्र क्लाॅथ स्टोअर्स कडून दिवाळी भेट!

अकोले प्रतिनिधी 

संगमनेर येथील राजेंद्र क्लाॅथ स्टोअर्स  या फर्म च्या वतीने सामाजिक जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेच्या पिंपळदरी ता अकोले  येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या ३५ एकल व अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना दिवाळी भेट म्हणून रंगीबेरंगी कपड्यांचे वाटप करण्यात आले.

 यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणीत झाला . या उपक्रमासाठी प्राथमिक शिक्षिका सौ. संगीता कैलास आंबरे यांनी प्रयत्न केले. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय मलाव , सुनील शेळके, राधेश्याम जगधने, मंदा घुले, भाऊसाहेब राऊत, शंकर कडाळे,शितल गिरी ,भटू नागमल,उन्नती वाघ  ,विठ्ठल चौधरी, अशोक कोरके ,सुनील डोळस, योगेश येवले, छाया ठोकळ ,मंगेश निकम ,प्रमोद कोल्हे ,बाबासाहेब नरळे ,मारुती कुदळे ,दत्ता जाधव ,बाळासाहेब जोरवर ,लक्ष्मण खंडागळे ,अलका गुळवे ,पुष्पा गायकवाड , कुणाल घोडके यांनी उपक्रमा संदर्भात आनंद व्यक्त केला

   राजेंद्र क्लाॅथ स्टोअर्स संगमनेरचे संचालक सचिनशेठ सोमाणी यांचे प्रती मनापासून आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. . ….

———–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button