मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ची जिल्ह्यात प्रभावी पणे अंमलबजावणी करू – जिल्हाधिकारी

पारनेर प्रतिनिधी
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ची जिल्ह्यात प्रभावी पणे अंमलबजावणी करू असे आश्वासन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शिवपानंद रस्ता चळवळीचे कार्यकर्त्यांना दिले
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची घोषणा करत शासननिर्णय काढला याच धर्तीवर शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे अहिल्यानगर शासकीय विश्रामगृहावर जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची पारदर्शक अंमलबजावनी अहिल्यानगर जिल्ह्यात करावी या संदर्भात रस्त्यासाठी लागणारी निशुल्क मोजणी आणि पोलिस बंदोबस्त, सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून मजबुतीकरण करणे, गतिमान पद्धतीने काम करण्यासाठी शेतरस्त्यांसाठी १००% यंत्रसामग्रीचा वापर,रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण,दगडी नंबरी लावणे, गाळ, माती, मुरूमासाठी कोणतेही स्वामित्व शुल्क आकारू नये, झिरो पेण्डसी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना चळवळीच्या वतीने देण्यात आले

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सहानुभुतीपूर्वक संवाद साधत तातडीने सबंधित विभागांना आदेश देण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर जिल्हाभरातील विविध तालुक्यांमधुन आलेल्या प्रत्येक शेतकराऱ्याचे निवेदन पाहून स्वतः फोटो काढून संबंधित विभाच्याअधिकाऱ्यांना फोटो पाठवत शेतकऱ्यांची सहानुभुतीपूर्वक संवाद साधत शेतकऱ्यांची मने जिंकली यावेळी शेतकऱ्यांनी पुष्पगुच्छ देत साहेबांचा सन्मान केला यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील, सुरेश वाळके, रविंद्र खुडे,पोपट शेळके,बाळासाहेब थोरात,सचिन शेळके,अशोक कचरे,,संजय साबळे, भाऊसाहेब वाळूंज,बबन गुंड,दशरथ वाळूंज,विठ्ठल निर्मळ,आशाबाई वाघ, उषाताई हुके,कानिफ कदम,प्रशांत चौधरी आदिंसह विविध तालुक्यातील शिवपाणंद चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.



