इतर

संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेचा १५० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण…

संगमनेर प्रतिनिधी

संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत १५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या उल्लेखनीय यशामध्ये संस्थेच्या सर्व सभासद, ठेवीदार तसेच हितचिंतकांचा मोलाचा सहभाग लाभला असून संस्थेच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या करड्या शिस्तीत आणि नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्याला योग्य दिशा मिळाली. तसेच अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेची भक्कम आणि नियोजनबद्ध प्रगती साध्य होत असून संस्थेच्या विकासाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. त्याच प्रमाणे आद. सत्यजीतदादा तांबे यांच्या दूरदृष्टीत संस्था योग्य दिशेने भरारी घेत आहे. याच उत्सवात संस्थेने १५० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे.

याचे औचीत्य साधत मा. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते केक कापत आनंद साजरा केला. या प्रसंगी दुर्गाताई यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत संस्थेच्या सुरवातीच्या काळाची आठवण करून दिली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री राणीप्रसाद मुंदडा, व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी, डॉ. नाजिमुद्दिन शेख, श्री. विलास दिघे, डॉ. माणिकराव शेवाळे, श्री. सुर्यकांत शिंदे, श्री. नानासाहेब वर्पे, श्री. दत्तात्रय आरोटे, अॅड. प्रशांत गुंजाळ, श्री. श्रीकांत कोकणे, डॉ. सूचित गांधी, श्री. सुदिप वाकळे, श्री. उमेश बोटकर, श्री. सोमेश्वर दिवटे, सौ. सुलभाताई दिघे, सौ. सुनंदाताई दिघे, श्री. अनिल सातपुते, श्री. अमित कलंत्री आदी संचालक, व्यवस्थापकीय सल्लागार श्री. प्रकाश गुंजाळ, व्यवस्थापक श्री. उमेश शिंदे आणि कर्मचारी उपस्थितीत होते.

याचबरोबर, संग्राम नागरी सहकारी पतसंस्था लवकरच स्वतःच्या भव्य-दिव्य आणि अद्ययावत इमारतीत स्थलांतरित होणार आहे. पत्ता- कवी आनंद फंदी नाटयगृहासमोर, पोलिस स्टेशन रोड, संगमनेर.    

सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार, वेळेवर व दर्जेदार सेवा आणि आर्थिक शिस्त यामुळे संग्राम पतसंस्थेने अल्पावधीतच परिसरात विश्वासार्ह व मजबूत आर्थिक संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. याच विश्वासाच्या बळावर आज संस्थेने १५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भविष्यातही सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत संस्थेची प्रगती अधिक वेगाने साध्य करण्याचा संकल्प संचालक मंडळ व कर्मचारीवर्गाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button