इतर

ब्राम्हणवाड्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा

 कारवाईत १० लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोतुळ प्रतिनिधी 

 अकोले तालुक्यातील  ब्राम्हणवाडा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने दारू विक्री विरोधात धडक कारवाई करत चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण १० लाख ५२ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक अकोले पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसायांची माहिती घेऊन ४ ऑगस्ट रोजी पथक अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना

ब्राम्हणवाडा येथील  ब्राम्हणवाडा – बोटा मार्गावरील

स्वामी समर्थ अक्वा शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये अनिष बाबू पटेल हा बेकायदेशीरपणे देशी- विदेशी मद्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अनिष बाबू पटेल ( वय ५८), नदीम याकुब पटेल (वय ३१) आणि नाजीम पटेल (वय ३१), सर्व रा. ब्राम्हणवाडा, ता. अकोले यांना ताब्यात घेतले.

तपासणीत आरोपींकडून ४९, १७० रुपयांच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या, ५१ हजार ३३० रुपयांचे दोन मोबाईल,६०० रुपये रोख, १ लाख रुपयांची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी आणि ८ लाख ५० हजार रुपयांची हुंडाई कंपनीची एमएच-१७ जेए-४९४६ क्रमांकाची कार एकूण १० लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०८ / २०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत.

याच कारवाईदरम्यान ब्राम्हणवाडा येथील हॉटेल सम्यक येथे उत्तम आनंद शिंदे ३४, रा. ब्राम्हणवाडा) हा बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करताना आढळून आला.त्याच्याकडून १ हजार ७९० रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०७ / २०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके, योगेश कर्डिले आणि आदिनाथ पाखरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button