जेष्ठ साहित्यिक सुरेश शिंगटे यांना भारत भूषण पुरस्कार जाहीर

एस के जाधव
कोकणवाडी प्रतिनिधी
विरमाडे. ता वाई. जि सातारा येथील आदर्श शिक्षक व जेष्ठ साहित्यिक श्री. सुरेश हरीभाऊ शिंगटे यांना राष्ट्रीय भारत भूषण ज्येष्ठ आदर्श साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीसाठी देण्यात आला आहे.
साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन व रमाई आंबेडकर संस्था यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण दि. १६ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाच्या कार्यालयात होणार आहे. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे

श्री. सुरेश हरीभाऊ शिंगटे हे ज्येष्ठ साहित्यिक आहे त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या पुस्तक प्रकाशित झाले आहेत
माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळ पुणे यावर
त्यांनी समीक्षक म्हूणन चार वर्षे काम पाहिले, “
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी आदर्श“कावार, कादंबरीकार, समग्र साहित्यावर
डॉक्टरेट पदवी मिळवली आहे त्यांच्या काही कथांचे कन्नड भाषेत भाषांतर झाले आहे. कथाकथनकार, वक्ते म्हणूनही ते
प्रसिद्ध आहेत.
या पुरस्काराबद्दल मंत्री मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, मर्ढे, विरमाडे
ग्रामस्थांनी तसेच विविध जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन केले आहे.


