अमृतवाहिनी सहकारी बँकेचा व्यवसायाचा 1100 कोटींचा टप्पा पार

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने कायम तालुक्यातील नागरिक, शेतकरी, युवक, उत्पादक यांना आर्थिक दिलासा दिला असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या बँकेने व्यवसायाचा 1100 कोटींचा टप्पा पार केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली आहे.
बँकेच्या यशस्वी कामकाजाबाबत अधिक माहिती देताना चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी केलेल्या बँकेने कायम शेतकरी,व्यापारी,युवक यांना मदत केली आहे.
सभासद,व्यापारी,नागरिक,शेतकरी या सर्वांचा बँकेवर मोठा विश्वास असून 665 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत झाले असून 446 कोटी रुपयांचे कर्ज वाटप बँकेने केले आहे. त्याचबरोबर कर्ज वाटपामध्ये निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांना मदत करण्याकरता भांडवली कर्जाची योजना कार्यरत केली असून त्या अंतर्गत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वाटप केले आहे. याचबरोबर तालुक्यातील युवकांना उद्योग व्यवसायाला मदत करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळा अंतर्गत ही मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले आहे.
तसेच गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक स्वरूपाचे कर्ज,अत्यंत कमी व्याजदरामध्ये व कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करून नागरिक व अमृत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आले आहे. बँकेने काय ऑडिटचा अ दर्जा राखला असून नवीन अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर केला आहे.
एटीएम,फोन पे, गुगल पे या सर्व डिजिटल बँकिंग प्रणाली सुरू करण्यात आल्या असून यामुळे नागरिक व ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट पद्धतीमध्ये ही जास्त फायदा होत आहे. कामकाजातील सातत्यपूर्ण गुणवत्ता, नम्रता, तत्पर सेवा आधुनिक प्रणालींचा वापर यामुळे अमृतवाहिनी बँकेला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले असून मागील दोन वर्षांमध्ये सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या सर्व वाटचालीमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख व अमृत उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी यांचे कायम मार्गदर्शन लाभले असून व्हा.चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे सर्व संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती आणि सर्व कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली असल्याचे ते म्हणाले.
बँकेच्या यशस्वी वाटचालीबद्दल मा.कृषी व महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात,शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, पांडुरंग पाटील घुले, ॲड माधवराव कानवडे,लक्ष्मणराव कुटे, बाजीराव पाटील खेमनर, हौशीराम सोनवणे,रामहरी कातोरे, यांच्यासह सर्व पदाधिकारी व मान्यवरांनी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.



