इतर

जमाबंदी आयुक्त सुहास दिवसेंमुळे शिव पाणंद शेतरस्त्यांना राज्यात ओळख मिळाली- शरद पवळे

पारनेर प्रतिनिधी

शिव पाणंद शेतरस्ता शासननिर्णयांत जमाबंदी आयुक्तांचे निर्णायक योगदान असल्याचे शिव पाणंद शेतरस्ता चळ वळीचे नेते शरद पवळे यांनी म्हटले आहे

महाराष्ट्रातील शिव पाणंद शेतरस्ता सीमांकन व क्रमांकन अभियानात भू-अभिलेख व भूमापन विभागाची भूमिका निर्णायक ठरली. अभियानाला प्रशासनाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल शरद पवळे यांनी मा. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसें यांचे पेढे भरवून स्वागत केले आणि राज्यभरातील शेतरस्त्यांच्या मोजणी, सीमांकन व नकाशा अद्ययावत प्रक्रियेस गती मिळावी यासाठी निवेदन सादर केले.

🔹 प्रमुख मागण्या:
1️⃣ प्रलंबित शेतरस्ता अहवाल सक्तीने सादर करावेत
2️⃣ प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र प्रशिक्षित भुकरमापक नेमावेत
3️⃣ “जादा रस्ता” प्रकरणांसाठी अतिरिक्त सर्व्हे टीम
4️⃣ कायमस्वरूपी व कंत्राटी भरतीत समतोल राखावा
5️⃣ तांत्रिक साधनसामग्रीत वाढ

“शिव पाणंद अभियान ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरेल,” असे पवळे म्हणाले.

यावेळी : रविंद्र खुडे, सुरेश वाळके, चंद्रकांत कापडे, दत्तात्रय बांगर, अजय वाचकर, अनिल लगड, प्रफुल्ल वायकर, दत्तात्रय लोखंडे आणि काळूराम पवार.उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button